नाशिक – महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे कायदेशीर ज्ञात स्त्रोतांपेक्षा ६४ टक्के अधिक म्हणजे जवळपास एक कोटींची मालमत्ता आढळून आली आहे. अवघ्या १३ वर्षातील शासकीय सेवेत धनगर यांनी डोळे दिपविणारी मालमत्ता जमवली. ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्या प्रकरणी धनगर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता दुसरा गुन्हा दाखल केला आहे. धनगर यांची सक्त वसुली संचलनालयाकडून (इडी) चौकशीचीही घोषणा झाली आहे.

जून महिन्यात मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना अटक झाली होती. तपासात धनगर यांच्याकडे ८५ लाखाची रोकड, ३२ तोळे सोन्याचे दागिने, सदनिका, भूखंडाचे कागदपत्रे आढळले होते. बँक खात्यात ३० लाखहून अधिकची रक्कम सापडली होती. या कारवाईनंतर धनगर यांच्या कार्यपध्दतीचे अनेक किस्से समोर आले होते. कर्मचाऱ्यांशी त्यांचे वर्तन अतिशय उर्मट होते. एखाद्याचे काम बरोबर नाही, अशी कुणी तक्रार केल्यास त्या लेखी देण्यास सांगत असत. तक्रार प्राप्त झाली की, समोरच्या व्यक्तीवर दबाव आणून त्याच्याकडून पैसे उकळायचे, अशी त्यांची कार्यशैली राहिल्याचे सांगितले गेले.

Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?

हेही वाचा >>>जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आंदोलन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धनगर यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू केली होती. धनगर या जून २०१० ते तीन जून २०२३ या कालावधीत शासकीय सेवेत कार्यरत होत्या. या कालावधीत कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक ९६ लाख ४३ हजार ८०९ रुपयांची अपसंपदा त्यांनी जमविल्याचे उघड झाले. कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा ६४ टक्के अधिक मालमत्ता त्यांच्याकडे आढळली. यावरून धनगर यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप घुगे यांनी ही चौकशी केली.

हेही वाचा >>>Jalna Lathi Charge: जालन्यात लाठीमाराचा आदेश कोणी दिला; रोहित पवार यांचा प्रश्न

दरम्यान, धनगर यांच्यासह शिक्षण विभागातील लाचखोरीचा विषय विधानसभेतही गाजला होता. नाशिक हे शिक्षणाचे केंद्र बनत असताना दुसरीकडे मागील काही वर्षात तीन, चार शिक्षणाधिकारी लाचखोरीत सापडल्याचे समोर आले होते. मनपा शिक्षणाधिकारी धनगर यांच्या मालमत्तेची सखोल चौकशीची मागणी आमदार सीमा हिरे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर यांचे प्रकरण सक्तवसुली संचलनालयाकडे पाठविले जाईल, असे जाहीर केले होते.