लोकसत्ता वार्ताहर
धुळे: शहरातून जाणाऱ्या मुंबई ते आग्रा महामार्गावर असलेल्या महामार्ग पोलीस चौकीच्या पाठीमागील अवैध व्यवसायावर अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः छापा टाकून ७७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यात विविध वाहनांच्या सुट्या भागांचा समावेश आहे. या सर्व वस्तू चोरीच्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून २० जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मोहाडी नगर ठाण्याचे हवालदार प्रभाकर सोनवणे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीपुढे महामार्ग पोलीस चौकी आहे. या चौकीच्या पाठिमागे पत्र्याची २० ते २२ दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये विविध वाहनांचे सुटे भाग विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
आणखी वाचा-दुष्काळात साडेतीन हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा अपव्यय, १५ हजार हेक्टरवरील शेतीला फटका
या प्रकरणी वारीसअली अहमदखान, सगीरखान सब्बीरखान, अजहरअली रोनकअली, अख्तरअली अकबरअली, मजहरअली रोनकअली, असगरअली रोनकअली, सिराजअली जाफरअली, अजहरअली रोनकअली, अख्तरअली गुलामअली (सर्व रा. मुल्ला कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे), असगरअली अकबरअली, मोहम्मद हुसेन नियाकतअली, अहमद हुसेन, तुफेल अहमदशेख (रा. जामचा मळा, धुळे), मोहम्मद रफिक, गुलामनबी दस्तगीरशेख (रा. कबीरगंज, धुळे), एहसास, कौंसरअली, सगीरशेख, आझादभाई व जाफरअली (सर्व रा. धुळे) यांच्याविरूद्ध मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.