नाशिक: सत्तेत असलेल्या लोकांची भाषा पाहा. गृहमंत्रीच रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत, भडक भाषणे केली जात आहेत. निवडणुका जवळ आल्यावर त्यांना लाडकी बहीण आठवली. आता दंगली घडवल्या जात आहेत. या सर्वांमागे भाजपचे भडक भाषण करणारे प्रतिनिधी, कार्यकर्ते आहेत, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

येथील परशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात सुळे यांच्या उपस्थितीत महिला पदाधिकारी मेळावा झाला. यावेळी मार्गदर्शन करताना सुळे यांनी, आपल्याला भांडण करणारे तसेच दंगली घडवणारे सरकार नको, असे सांगितले. आपल्याला प्रामाणिकपणे काम करणारे सरकार हवे. ते महाविकास आघाडीच देऊ शकेल. करोना काळात राजेश टोपे आणि उध्दव ठाकरे यांनी केलेले काम सर्वांनी पाहिले. नाशिक दत्तक घेणाऱ्यांची भाषा करणाऱ्यांनी नाशिकचा कोणता विकास केला, असा प्रश्न उपस्थित करुन सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. हे लोक भाषण करुन गायब होतात. माझ्या मतदार संघात येतात, हमीभावाची भाषा करतात, पण पुढच्या पाच वर्षात कोणीच येत नाही. आम्हाला हमी भावाने फसवले, तुम्हांला दत्तक भाषा करुन फसवले. सध्या गृहमंत्री फडणवीस लाडकी बहीण योजनेवरून विरोधी पक्षांवर विरोधक महिलांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत आहेत. या आरोपाची सखोल चौकशी करण्याची मागणी सुळे यांनी केली.

Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Congress protest against BJP , Congress Mumbai office attack , Congress Nagpur protest ,
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
Institution director arrested in case of abusing school children Pune print news
शाळकरी मुलांवर अत्याचार प्रकरणात संस्थाचालक अटकेत
MPs scuffle outside Parliament Case filed against Rahul Gandhi
संसदेबाहेर आखाडा! खासदारांमध्ये धक्काबुक्की; राहुल गांधींविरोधात गुन्हा
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
Kangana Ranaut rahul gandhi
Kangana Ranaut : “संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत…”, कंगना रणौत यांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप
Burning of Amit Shahs symbolic effigy in akola
अमित शहांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, अकोल्यात वंचित आक्रमक; राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम

हेही वाचा >>>Chhagan Bhujbal : नार-पारविषयी माझी भूमिका हा योग्य पर्याय – छगन भुजबळ यांचा दावा

विरोधकांकडे आता मुद्दे राहिले नाहीत. फडणवीस आता भ्रष्टाचारावर बोलत नाहीत. कारण, राष्ट्रवादीला भाजपने भ्रष्टाचारमुक्त केले. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते सध्या त्यांच्या पक्षात मंत्री किंवा अन्य मित्रपक्षांत आहेत. खासदार भगरे यांनी संसदेत पहिल्याच दिवशी कांदाप्रश्न मांडला. त्यांनी एका मंत्र्याला पराभूत केले. मंत्री चांगले. त्यांची अडचण नाही. परंतु, त्यांच्या पक्षाला कांदा आणि शेतकऱ्यांविषयी घेणे नाही. कांदा भाव म्हटला की त्यांना महागाई दिसते. जीएसटीने महागाई वाढत नाही का, असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकार आल्यावर शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा कर शून्यावर आणा, ही मागणी करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

हे लोक रडीचा डाव खेळणारे

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिन्ह तुतारी वाजविणारा माणुस आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात गोंधळ झाला. हे रडीचा डाव खेळणारे लोक आहेत. त्यांनी एकाला तुतारी दिली. तिथे गल्लत झाली. आपले चिन्ह सगळीकडे पसरवा, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले.

गृहमंत्र्यांवर विश्वास नाही

राज्याच्या गृहमंत्र्यांवर विश्वास नाही. परंतु, महाराष्ट्र पोलिसांवर आहे. लोकांना भडकविण्याचे काम सत्तेत असलेल्या लोकांनी केले. मतभेद होऊ शकतात. पण एकमेकांची डोकी फोडणे, ही आपली संस्कृती नाही. भडक भाषणे करणे हे भाजपचे काम. आपल्याला अस्वस्थ करणारे सत्तेतील लोक आहेत. महाराष्ट्र पोलीस अहोरात्र काम करत राहिल्याने आपण सुरक्षित राहिलो, असेही सुळे म्हणाल्या.

Story img Loader