जळगाव : तत्कालीन पालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तीन वर्षांनी त्यांचे आज जळगावात आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्ते व समर्थकांकडून करण्यात आली आहे. रात्री राजधानी एक्स्प्रेसने ते जळगावात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… ‘या’ सहा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी; कारणे शोधण्यासाठी कृती समिती गठीत

हेही वाचा… बिबट्यावर विद्यापीठाची तंत्रमात्रा, दीडशे एकर परिसर सुरक्षित

राज्यातील बहुचर्चित घरकुल घोटाळा प्रकरणी वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना 30 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. जैन यांना 31 ऑगस्ट 2019 रोजी धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. आता तीन वर्षांनंतर प्रथमच जळगावात त्यांचे आजज आगमन होत आहे. रात्री पावणेनऊला राजधानी एक्स्प्रेसने ते येणार असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे फलाटापासून थेट मोटारीपर्यंत लाल गालिचा अंथरण्यात येणार आहे. फुलांचा वर्षाव, ढोल-ताशांचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. गोविंदा रिक्षाथांबा, नेहरू चौक, टॉवर चौकमार्गे ते 7, शिवाजीनगर परिसरातील निवासस्थानी जातील. यावेळी सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक कार्यकर्त्यांची उपस्थितीची शक्यता आहे.

Story img Loader