जळगाव: मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर बाळाला काहीही करायचा अधिकार आहे. गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना हाणला. महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावर ये डर मुझे अच्छा लगा, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा >>> सुषमा अंधारेंच्या सभेपूर्वीच गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील स्वागतफलक गायब – ठाकरे गटातर्फे पोलिसांकडे तक्रार

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

महाप्रबोधन यात्रेतील दुसर्‍या टप्प्यासाठी उपनेत्या अंधारे या मंगळवारी जिल्ह्यात आल्या. याअनुषंगाने जळगावात प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे  यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या की, मी वारंवार सांगत आहे, आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात, तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. त्यामुळे जिल्ह्यातील पाच आमदार गेले असले आणि त्यांच्यासोबत काही टेंडर, गुत्तेदारीच्या राजकारणातले काही लोक गेले असले, तरी याचा अर्थ जळगावमध्ये शिवसेनेची क्षती झाली असे आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, जळगावमध्ये जोपर्यंत इथले सर्वसामान्य शिवसैनिक तग धरून निष्ठेने उभे आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची गरजच नाही.  पाचोर्‍यात आदित्य ठाकरेंची सभा जळगावसाठी न भूतो न भविष्यती अशी झाली होती. जे पाच लोक गेलेले आहेत, सत्ता असतानाही त्यांना वाय प्लस सुरक्षा घेऊन फिरावे लागते आहे, यातच सर्वकाही उत्तर येते.

हेही वाचा >>> नाशिक: तालुकानिहाय मोठ्या थकबाकीदारांच्या नावांना आता प्रसिध्दी; जिल्हा बँकेच्या थकीत कर्ज वसुलीला अल्प प्रतिसाद

विरोधकांची सुरक्षा काढली आणि बंडखोरांना वाढविण्यात आलेल्या मुद्द्यावर त्या म्हणाल्या की, बंडखोरांनाच सुरक्षेची गरज आहे. कारण, विरोधकांच्या पाठीशी लोकबळ आहे. लोक त्यांना सांभाळून घेत आहेत. लोकांना माहिती आहे, सत्ताधार्‍यांना सुरक्षेची गरज आहे. सत्ताधार्‍यांनी सत्ता ही अत्यंत कुटीलपणे, कुटनीतीने आणि कपटकारस्थानाने मिळविलेली आहे आणि ही कपटकारस्थाने जनतेला आवडलेली नाहीत. त्यामुळे जनता अत्यंत संतप्त आहे. या संतप्त जनतेपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी, तसेच त्यांना काही करू नये, म्हणून घाबरलेल्या सरकारने ही सुरक्षा वाढवून घेतली आहे. कारण, यामुळे त्यांना लोकांचे पाठबळ नाही, असा घणाघातही अंधारे यांनी केला.

हेही वाचा >>> जळगाव जिल्हा दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ; तीन नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार; दहा डिसेंबर रोजी मतदान

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पाळधीजवळ महामार्गावर लावलेल्या स्वागतफलक गायब केल्याच्या मुद्यावर अंधारे म्हणाल्या की, ये डर मुझे अच्छा लगा. मी या गोष्टी एन्जॉय करते. फलक पळविल्याने काय होतेय? तुम्ही फलक पळवताहेत, तुम्ही शिवसैनिक पळविणार आहात का? तुम्ही शिवसैनिकाचा विचार पळविणार आहात का? तुम्ही शिवसैनिकाशी असलेली आपुलकी आहे, जो आपलेपणा आहे, तो शिवसेनेचा जो मूळ विचार आहे, तो तुम्ही पळवू शकणार आहात का? त्यामुळे अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचे गुलाबभाऊंनी चिल्लरचाळे करू नये, नाहीतर लोकच त्यांना विचारतील, कुठल्यातरी गाण्यासारखं… कसं काय पाटील बरं आहे का… गुवाहाटीला काहीतरी खोक्याचा कारभार केला म्हणे. असं त्यांनी करू नये, अशी टीका अंधारे यांनी केली. बाळाला खोड्या करण्याचा अधिकार आहे. मग बाळ केस ओढतं, बाळ गालगुच्चे घेतं. बाळ आपल्या मोठ्या भावाच्या गालावर चापट्या मारतं, बाळच आहे ते. बाळाला काहीही करायचा अधिकार असतो, तर गुलाबभाऊ म्हणत असतील तर ही आमची छोटी बहीण आहे. बाळ आहे. ते सर्व मला बाळ म्हणून खोड्या करण्याचे अधिकार देताहेत. याकडे मी सकारात्मकतेने आणि खिलाडू वृत्तीने घेते, असेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील</strong>, पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>> विश्लेषण: गुजरात सरकार ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत, म्हणजे नेमकं काय होणार? त्याला विरोध का होतोय?

अंधारे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावरही वाक्बाण सोडले. किशोरआप्पांनी असं म्हटलं पाहिजे, पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. किशोरआप्पांचा अभ्यास असता तर त्यांना कळलं असतं, की सुषमा अंधारे गेली बावीस वर्षे सातत्याने फक्त राज्यभर नाही, देशभर नाही, तर जगभरातल्या शोषित, वंचितांच्या चळवळींमध्ये काम करतेय; परंतु ठीक आहे. जर त्यांना वाटतंय की, तुम्ही तीन महिन्यांनंतर दिसताहेत, तर तीन महिन्यांनंतरही ठीक. मुद्दा काय आहे, सुषमा अंधारे बाळ आहे का? सुषमा अंधारे तीन महिन्यांनंतर आली आहे का? सुषमा अंधारे नवी आहे का? सुषमा अंधारे आधीची टीकाकार आहे का? या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे काय आहे, सुषमा अंधारे जे प्रश्‍न तुम्हाला विचारत आहे, त्याची उत्तरे तुमच्याकडे आहेत का?

हेही वाचा >>> दिवाळीनंतर कांदा दरात ७०० रुपयांची उसळी; क्विंटलला अडीच हजाराचा भाव

आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद, वेदांता-फोक्सकॉन प्रकल्पासह टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्याबाबतही त्यांनी भाष्य केले. त्यावर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रातला एकेक उद्योग प्रकल्प गुजरातला जातो. सध्या महाराष्ट्राला कंगाल करण्याचे षडयंत्र चालू आहे. उद्योजकांशी व्यवस्थित बोलणे, समन्वय साधणे, उद्योजकांना आश्‍वस्त करणे, ही जबाबदारी सरकारची असते. सरकार येत-जात राहते. मात्र, उद्योगधंदे येत-जात नाहीत. उद्योगधंदे स्थिरावतात. आधीही सरकारांची अदलीबदली झाली. मात्र, उद्योगधंदे गेले नव्हते, असेही अंधारे यांनी सरकारवर टीका केली.

Story img Loader