राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणेच्या (एनआयए) वतीने गुरुवारी येथील मेहरुण परिसरातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेशी संबंधित असल्यावरुन एका संशयितास अकोल्याच्या दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> मालेगावात दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; एक जण ताब्यात

दहशतवादी क़ृत्यांसाठी निधीप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांवर गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा (एनआयए) आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने देशभरात ठिकठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा संस्थेने दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने ही कारवाई केली. या कारवाईत जळगाव येथून एकाला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> नाशिक : कृषी सेवा केंद्रात घरफोडी

अकोला येथील दहशतवादविरोधी पथकाने पहाटे चारच्या सुमारास मेहरुण परिसरातील प्रार्थनास्थळाजवळ झोपलेल्या तिघांना ताब्यात घेतले. त्यातील दोघांना चौकशीनंतर सोडून दिले. ताब्यात घेतलेली व्यक्ती जालना येथील असून तो काही दिवसांपासून जळगावात लपून बसलेला होता. त्याचे नाव अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (३२, रा. रेहमानगंज, वरुण अपार्टमेंट, जालना) असे आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.