नाशिक : हॉटेलमध्ये विशिष्ट भोजनावरून नोकराशी वाद घालत बंदूक रोखून धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला ग्रामीण पोलीस मुख्यालयातील अमलदार विशाल झगडे याच्याविरुध्द निलंबनाची कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे. उपरोक्त प्रकरणात संशयितास नाशिकरोड पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. संशयित झगडे हा नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचा अंगरक्षक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा

नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळील रामकृष्ण हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. याबाबत हॉटेलचे व्यवस्थापक सागर पाटील यांनी तक्रार दिली. रात्री साडेबारा वाजता संशयित झगडे हा दोन साथीदारांसह हॉटेलमध्ये आला. भोजनात काय हवे, याची नोंद घेत असताना नोकर सिरॉन शेख याने चपाती नसल्याचे सांगितले. यावरून झगडे आणि त्याच्या साथीदारांनी वाद घालत दमदाटी केली. हातावर पोलीस गोंदवलेले अक्षर असणाऱ्या संशयिताने कंबरेला असलेले बंदूक रोखून, मला रोटी पाहिजे, तू तिकडे काहीही कर, असा दम देत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात झगडेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित झगडेला अटक करून त्याचे सेवा बंदूक जप्त केले. न्यायालयाने संशयिताची जामिनावर मुक्तता केली. संशयित झगडे हा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे यांचा अंगरक्षक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची नाशिक ग्रामीण पोलिसांनी गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली. संशयित झगडेवर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.