धुळे : पिंपळनेर येथील वसतिगृहातून बेपत्ता झालेल्या बालकाचा पांझरा नदीपात्रातील झाडाझुडपात मृतदेह आढळून आल्यानंतर दहा महिन्यानंतर याप्रकरणी एकलव्य रेसिडेन्सी स्कूल, वसतिगृहाच्या दोन कर्मचार्‍यांसह मृत विद्यार्थ्याच्या समवयस्क चौघा विद्यार्थ्यांविरूद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी दिनेश बोरसे (३९, रा. दळूबाई गावठाण, साक्री) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार नीलेश बोरसे (१३, रा. टेंभा, साक्री) हा एकलव्य रेसिडेन्सी स्कूल वसतिगृहात राहत होता. दोन सप्टेंबर 2022 रोजी तो शाळेतून बेपत्ता झाला. नीलेश बेपत्ता झाल्यासंदर्भात वसतिगृहाचे तत्कालीन कर्मचारी भूषण पाटील, तत्कालीन शिक्षक ए. एच. सूर्यवंशी यांनी तसेच नीलेशचे समवयस्क असलेल्या चार विद्यार्थ्यांनी नीलेशच्या पालकांना माहिती दिली नाही. नीलेशच्या पालकांनी वेळोवेळी चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

हेही वाचा >>> बनावट खतामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे; मंत्र्यांचे निर्देश; पथकाकडून बांधावर जाऊन पाहणी

चार सप्टेंबर २०२२ रोजी नीलेश हा शिवाजी भोये यांच्या पेट्रोलपंपामागे असलेल्या पांझरा नदीच्या पात्रातील झाडाझुडपात मृत अवस्थेत आढळला. याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने दिनेश बोरसे यांनी साक्री न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने १२ जुलै २०२३ रोजी आदेश दिल्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी शुक्रवारी दोघा कर्मचार्‍यांसह चौघा विधीसंघर्शित बालकांविरूद्ध नीलेश याच्या मृत्यूस जबाबदार धरून गुन्हा दाखल केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspicious death of missing student from pimpalner hostel case against six persons ysh