धुळे : शहरातील संतोषी माता मंदिर चौक ते फाशीपूल दरम्यान भरधाव टँकरने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. कार चालक गंभीर असल्याने त्याला शासकीय हिरे महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात; तीन ठार, चार गंभीर जखमी

हा अपघात रविवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास झाला. जिल्हा पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेत कार चालक प्रकाश मुलानी हे गंभीर जखमी असून एक रिक्षा चालक किरकोळ जखमी आहे. अपर पोलीस अधीक्षक काळे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन  केले आहे. टँकर चालक हा मद्यधुंद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून राजेंद्रसिंग सकट असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.