पाच वर्षापासूनची पुरवणी प्रलंबित देयके मिळावीत तसेच आधार अद्ययावत करण्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी २० एप्रिल रोजी नाशिक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा मालेगांव महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील सहा हजार कर्मचाऱ्यांचे २०१८-१९ पासून १०० कोटी रुपयांची पुरवणी देयके प्रलंबित आहेत. या संदर्भात वेतन पथक अधीक्षक, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक या कार्यालयांकडे वारंवार विचारणा करूनही पुरवणी देयके मिळालेली नसल्याचे संघाने म्हटले आहे. राज्यात इतर ठिकाणी पुरवणी देयके मिळत असताना नाशिकमध्ये का मिळत नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना टक्केवारी दिली जात नाही म्हणून, ही स्थिती स्थिती उदभवली असल्याचा आरोप संघाने केला आहे.

हेही वाचा >>>जळगाव: बाबरी मशिदीसंदर्भातील चंद्रकांत पाटील यांची भूमिका व्यक्तिगत; चंद्रशेखर बावनकुळे

शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्याचे सक्तीचे केले आहे. परंतु, शासनाच्या संकेतस्थळात अनेक तांत्रिक अडचणी येतात. यामुळे आधार अद्ययावत होत नसतांना शिक्षकांची पदे मात्र कमी होत आहेत. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्ययावत करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, आधारकार्ड प्रत्यक्ष बघून कर्मचारी संचास मान्यता देण्यात यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास २० एप्रिल रोजी उपसंचालक कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष आर. डी. निकम, रईस अहमद यांनी दिला आहे.