जळगाव: चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत पुणे येथील तेजस पाटील, तर वादविवाद स्पर्धेत चाळीसगावमधील राणी चव्हाण, शुभम रावते आणि विशेष विषयात धुळे येथील प्रफुल्ल माळी विजेते ठरले.
संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनायक चव्हाण, उपाध्यक्षा पुष्पा भोसले, सहसचिव रावसाहेब साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून माजी संचालक डॉ. कर्तारसिंग परदेशी, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर आदी उपस्थित होते. स्पर्धक धर्मेश हिरे (कुसुंबा) आणि तेजस पाटील (पुणे) यांनी मनोगत व्यक्त केले. यश पाटील आणि प्रफुल्ल माळी (कुसुंबा) यांनीही भाषण केले. परीक्षक म्हणून आकाश पाटील (पुणे), तुषार शिल्लक (मालेगाव), अस्मिता गुरव (जळगाव) यांनी काम पाहिले. उपप्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी परिचय करून दिला. मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धांतील विजेते
वक्तृत्व – प्रथम- तेजस पाटील (एस. पी. पी. महाविद्यालय, पुणे), द्वितीय- यश पाटील (बिर्ला महाविद्यालय, मुंबई), तृतीय- संकेत पाटील (गडहिंग्लज, कोल्हापूर). उत्तेजनार्थ- पराग बद्रिके (पुणे), धर्मेश हिरे (धुळे), मेघराज शेवाळे (लातूर), साईनाथ महाद्वार (नांदेड). विशेष विषयासाठी विशेष पारितोषिके – प्रथम- प्रफुल्ल माळी (धुळे), द्वितीय (विभागून)- राणी चव्हाण (चाळीसगाव) आणि अनिकेत ढमाळे, तृतीय- शुभम रावते (चाळीसगाव).
वादविवाद स्पर्धा – प्रथम- राणी चव्हाण आणि शुभम रावते (चाळीसगाव), द्वितीय- सौरभ आवटे आणि करण गवळे (औरंगाबाद), तृतीय- कृष्णाली कोकाटे आणि वैष्णवी साताळकर (येवला), उत्तेजनार्थ – धर्मेश हिरे (धुळे), यश पाटील (मुंबई), साईनाथ महाद्वार (नांदेड)