लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढली असली तरी काही जणांच्या नावाने आधीच कोणीतरी मतदान केल्यामुळे संबंधितांना मतदान यंत्राऐवजी प्रदत्त मतदान (टेंडर व्होटिंग) करावे लागले. नाशिक पश्चिम या एकाच मतदारसंघात १५७ मतदारांना असे मतदान करावे लागले. ज्यांनी मतदानाचा आग्रह धरला, त्यांना हा पर्याय मिळाला. परंतु, आपल्या नावाने कोणीतरी आधीच मतदान केल्याचे समजल्यावर ज्यांनी आग्रह धरला नाही, त्यांना माघारी फिरावे लागल्याची शक्यता आहे. १४ मतदारसंघातील प्रदत्त मतदानाची आकडेवारी गुलदस्त्यात आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…

यंदा विधानसभा निवडणुकीत मतदान ६९.१२ टक्क्यांवर गेले. मागील दीड ते दोन दशकातील विधानसभा निवडणुकींमधील हे सर्वाधिक मतदान आहे. महिलांच्या मतदानात लक्षणीय वाढ झाली. मतदानाचा टक्का वाढला असला तरी निवडणुकीत मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानेच त्याच्या नावाने मतदान केल्याचे काही प्रकार घडले. निवडणूक यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मूळ मतदार मतदानापासून वंचित राहिले. त्याने मतदान करण्याआधीच कोणीतरी त्याच्या नावाने मतदान करून गेले. नंतर मूळ मतदार मतदानास आल्यानंतर प्रकार उघड झाला. अशावेळी संबंधिताची ओळख पटवून त्याला प्रदत्त मतदान करता येते. म्हणजे केंद्रस्तरीय अधिकारी मतपत्रिका देऊन हे मतदान नोंदवतो. त्याला मतदान यंत्रावर मतदान करता येत नाही. कारण, त्याच्या नावाने आधीच कोणीतरी मतदान केलेले असते.

आणखी वाचा-दिंडोरीचा निकाल सर्वात उशीरा देवळाली, निफाड लवकर

नामसाधर्म्य आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र व सचित्र मतदार यादीतील छायाचित्र पुसट असणे, यामुळे हे प्रकार घडत असल्याचे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे.आपल्या नावाने कोणीतरी मतदान केल्याचे लक्षात आल्यानंतरही ज्यांनी प्रदत्त मतदानाचा आग्रह धरला नाही, त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागल्याची साशंकता व्यक्त केली जाते. नाशिक पश्चिम मतदारसंघात १५७ जणांनी प्रदत्त मतदान केले. म्हणजे, त्यांच्या नावाने कोणीतरी आधीच मतदान करून गेले होते. जिल्ह्यातील अन्य १४ मतदारसंघात किती जणांना प्रदत्त मतदान करावे लागले, याची स्पष्टता झाली नाही.

शुकवारी निवडणूक अधिकारी व यंत्रणा मतमोजणीच्या तयारीत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. मतमोजणीत प्रदत्त मतदानाची गणना होत नाही. निवडणूक निकालाविषयी न्यायालयात कोणी दाद मागितल्यास आणि न्यायालयाने आदेश दिल्यास या मतांची मोजणी केली जाते, असे निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader