प्रशासनाविरोधात संताप, विजेचा धक्का बसून दुर्घटना
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : भूमिगत गटार योजनेचे काम करताना वायर तुटल्याने विजेचा धक्का बसून सिडकोतील शिवशक्ती चौकात २५ वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारच्या या घटनेत त्याचा भाऊ जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले. नगरसेवक घटनास्थळी आले असता त्यांना रहिवाशांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले. प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतल्याने त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
सिडकोतील शिवशक्ती चौकात नानाजी जगताप कुटुंबासमवेत राहतात. या भागात भूमिगत गटार बांधण्याचे काम सुरू होते. काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने भूमिगत वायर तुटली होती. ठेके दार तसेच विद्युत वितरण कं पनीच्या निदर्शनास रहिवाशांनी हा प्रकार आणून दिला होता.
त्या वेळी संबंधितांनी तुटलेली वायर योग्य पद्धतीने न जोडल्याने विद्युत प्रवाह खड्डय़ातील पाण्यात उतरला. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता जगताप यांचा मोठा मुलगा अमोल (२८) हा घराबाहेर पाणी मारण्यासाठी गेला असता त्याचा पाय खड्डय़ात पडला. त्याला विजेचा झटका बसला. त्याचा आवाज ऐकू न लहान भाऊ धीरज (२५) हा मदतीसाठी धावला. त्यालाही विजेचा धक्का बसला. अमोल दूरवर फे कला गेला. धीरजला वाचविण्यासाठी आई-वडिलांनी धाव घेतली.
या घटनेत धीरजचा मृत्यू झाला. जखमी अमोल यास तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरीसह इतर अधिकारी दाखल झाले. धीरज हा मुंबई येथे खासगी कार्यालयात नोकरीला होता.
सिडकोत लोंबकळणाऱ्या तारांमुळे काही जणांचा बळी गेल्याने तारा भूमिगत करण्यात येत आहेत. परंतु, हे काम योग्य पद्धतीने होत नसल्याचे गुरुवारच्या घटनेने सिद्ध के ले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. नगरसेवक त्या ठिकाणी आले असता त्यांना पिटाळण्यात आले. आमदार सीमा हिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता धीरजच्या मृत्यूबद्दल नुकसानभरपाई द्यावी आणि विद्युत तारांची समस्या कायमची दूर करावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रशासनाकडून आश्वासन मिळत नसल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. अधिकाऱ्यांकडून नागरिकांची समजूत घालण्याचे प्रयत्न करण्यात येत होते.
दाटीवाटीच्या कामगारबहुल सिडको परिसरात विद्युत तारांचा धक्का लागल्याने याआधी गायत्री कलेक्शनचे संजय कोठावदे, मागील दिवाळीत एकाच कु टुंबातील चार व्यक्ती, सावता नगर येथे पतंग उडवताना १४ वर्षांच्या मुलाचा, शिवशक्ती चौकात ७० वर्षांच्या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण विधानसभेतही गाजले आहे.