सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनांची योग्यता चाचणी पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने होऊन अपघात कमी करण्यास हातभार लावण्याच्या उद्देशाने देशात प्रथमच येथे कार्यान्वित झालेले स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र विविध स्वरूपांच्या आक्षेपांमुळे अडचणीत आले आहे. या यंत्रामार्फत विविध त्रुटी दर्शवून वाहने वारंवार नापास केली जात असल्याने निर्माण झालेल्या तिढय़ात खा. हेमंत गोडसे यांनी शुक्रवारी मध्यस्ती करत पुढील दोन दिवस केंद्र बंद ठेवून वाहन तपासणी दृश्य स्वरूपात करण्याचा तोडगा काढला. त्याची अंमलबजावणी महिनाभर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे संचालन करणाऱ्या रोसमेर्टा टेक्नॉलॉजीसने पारदर्शक तपासणीमुळे आरटीओ दलालांचा व्यवसाय धोक्यात आल्यामुळे या केंद्राच्या कामात अवरोध निर्माण केला जात असल्याचा आरोप केला आहे. केंद्रास विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास वाहनांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या उपक्रमास खीळ बसणार असल्याची तक्रार कंपनीने केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा