धुळे – शहर परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असला तरी महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा  आरोप करत सोमवारी ठाकरे गटातर्फे प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर चिता रचत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. शहरात साथीच्या आजारांसह डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढला असून खासगी रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयांमध्ये शेकडो रुग्ण दाखल होत आहेत. गेल्या आठवडाभरात खासगी रुग्णालयात तीन ते चार रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील देवपूर, चितोड रोड, मोगलाई, आझादनगर तसेच ११ गावातील अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून हे सर्व रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक ग्रामीण पोलिसांची अवैध व्यवसायांविरोधात मोहीम; आठ दिवसात ७० गुन्हे दाखल

महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरात एक ते १५ ऑक्टोबर या कालावधीत १५, सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत ४५ तर, एकट्या ऑक्टोबरमध्ये ५४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णांबद्दल महानगरपालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याचा दावा करण्यात आला आहे. मनपाची आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडली असून शहरात अनेक महिन्यांपासून धुरळणी, फवारणी झालेले नाही, त्यामुळे डासांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दोन-चार दिवस उचलले जात नाहीत. गटारी, नाले वेळेवर साफ होत नाहीत. डेंग्यू डासांची उत्पत्ती रोखण्याकरिता प्रभागनिहाय सर्वेक्षण घरोघरी होणे गरजेचे आहे. आरोग्य विभागातील ५२ कर्मचारी संपूर्ण साडेसहा लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या आरोग्याची काळजी करण्यात समर्थ नाहीत हे वेळोवेळी सिद्ध झाले असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group protest against dhule municipal administration for neglecting dengue outbreak zws
Show comments