धुळे- शहरातील खुली करण्यासाठी शुक्रवारी ठाकरे गटाने मोर्चा काढला.येत्या दोन दिवसांत कुलूपबंद शौचालये नागरिकांसाठी खुली न झाल्यास नागरीकांना मनपा आयुक्त व महापौरांच्या बंगल्यावर नैसर्गिक विधीसाठी आणले जाईल.असा इशारा ठाकरे गटाने दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठेकेदारांकडून केवळ टक्केवारी घेऊन धन्यता मानणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वच्छ भारत अभियान” या उपक्रमाला काळे फासले आहे, अशा शब्दात महापालिकेच्या भूमिकेचा यावेळी निषेध करण्यात आला.
हेही वाचा >>> गंगापूर धरणात चर खोदण्याच्या नावाखाली उधळपट्टीचा डाव; दशरथ पाटील यांचा आरोप
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,की धुळे शहराची लोकसंख्या वाढीव गावांची हद्द गृहितधरून साङेसहा लाखांच्या आसपास आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या तुलनेत संपूर्ण धुळे शहरात केवळ १४५ सार्वजनिक शौचालये असुन दररोज सुमारे पावणेदोन लाख नागरिक या शौचालयांचा वापर करतात.सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल दुरूस्ती, साफसफाई साठी महापालिकेने १३ संस्थांना ठेका दिला होता,पण गेल्या दहा महिन्यांचे देयके न मिळाल्याने या संस्थानी १५ जुन पासुन काम बंद आंदोलन सुरु केले. संबंधित संस्थानी देयक अदा करावेत म्हणून प्रशासनाकडे अनेकदा विनंती अर्ज व स्मरण पत्रे दिली असली तरी ढिम्म महापालिका प्रशासनाने मागणीकङे दुर्लक्ष केले.
सत्ताधारी भाजपा मनपा नगरसेवक, महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य अधिकारी या सर्वांनीच या संस्थांच्या मागणीकङे दुर्लक्ष केले,
स्वच्छतेसाठी पुरेसे कर्मचारीच नसल्याने शहरातील जवळपास सर्वच शौचालयांना महापालिकेने कुलुपे लावली आहेत.७५० स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असले तरी ते स्वच्छतागृहावर पडणारा भार पाहाता तुलनेने कमी पडतात.यामुळे महापालिका प्रशासनाने या शौचालयांना कुलुपे ठोकण्याचा सोयीचा पर्याय निवडला आहे.यामुळे मात्र शहरातील पावने दोन लाख नागरिकांची कुचंबना झाली आहे.
हेही वाचा >>> नाशिक: अकरावी प्रवेशासाठी रांगा ; कागदपत्रे जमा करताना अडचणी
वैतागलेल्या काही भागातील रहिवाशांनी शौचालयांचे कुलुपे तोङले आहेत.अनेक ठिकाणी तर पाण्यासाठी लावलेल्या विद्युत मोटारी चोरण्यात आल्या असून शौचालयांमधे मैला साचल्याने अनेक वसाहतीत दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर झालेली ही दुर्दशा आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण करणारी आहे.या अवस्थेमुळे साथीचे आजार पसरण्याची भिती निर्माण झाली आहे.
भाजप नगरसेवक व महापौर यांच्या अकार्यक्षमते विरोधात जोरदार लक्षवेधी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील आदी उपस्थित होते