जळगाव : ठाकरे सेनेचा दसरा मेळावा म्हणजे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या विचारांचे मिश्रण असेल. मात्र, आमचा मेळावा हा हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र मेळावा असेल, असे वक्तव्य पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. जसा जसा दसरा मेळावा जवळ येतोय, तसतसा शिंदे-ठाकरे गटात वाद वाढत असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

हेही वाचा >>> शिंदे गटाचा शिवसेनेला पुन्हा धक्का; प्रवीण तिदमे यांची नाशिकच्या महानगरप्रमुखपदी नियुक्ती

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे मंगळवारी (२० सप्टेंबर) पहिल्यांदाच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावापासून तर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुक्ताईनगरपर्यंत सुमारे ७० किलोमीटरपर्यंत रोड शो होणार आहे. माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ विरुद्ध एकनाथ काय बोलणार, याकडेही  सर्वांचे लक्ष लागून आहे.