जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी रावेर गटात आता चिनावल येथील ठकसेन पाटील यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्याचा निर्णय नाशिक येथील सहकारी संस्थेच्या विभागीय उपनिबंधकांनी (दुग्ध) दिला आहे. जिल्हा दूध संघातून रावेर गटातर्फे चिनावल येथील वसंत सहकारी दूध संस्थेचे ठकसेन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर हरकत घेत त्यांच्या दूध संस्थेचा दूधपुरवठा कमी असल्याचे कारण देत ते उमेदवारीसाठी पात्र नसल्याची हरकत जगदीश बढे यांनी घेतल्याने पाटील यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- सहा महिन्यांच्या बालकांनाही लस?; गोवर नियंत्रणासाठी वयोमर्यादा घटवण्याबाबत केंद्राकडून लवकरच निर्णय

पाटील यांनी त्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, तसेच नाशिक येथील सहकारी संस्थेच्या विभागीय उपनिबंधकांकडे (दुग्ध) धाव घेत, आपला उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयावर आक्षेप घेत आपल्याला निवडणूक लढविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. पाटील यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. पाटील यांच्यातर्फे विशाल सोनवणे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पाटील हे स्वतः चिनावल येथील वसंत सहकारी दूध उत्पादक सोसायटीचे प्रतिनिधी आहेत. संस्थेतर्फे करण्यात आलेल्या दूधपुरवठ्याचा दाखला त्यांना सात नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे.

हेही वाचा- विमान प्रवासासाठी मुंबई, शिर्डीकडे धाव; धावपट्टी दुरुस्तीमुळे नाशिकची सेवा बंद

यात २०१९-२० या वर्षासाठी ८९ हजार ७५१ लिटर, २०२१-२२ या वर्षात ४२ हजार ६३८ लिटर याप्रमाणे असल्याची माहिती पाटील यांना देण्यात आली होती.परंतु त्यांनी दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला पाटील यांनी स्वतः संस्थेमध्ये जाऊन तपासणी केली. त्यात त्यांना २०२९-२० या वर्षात एक लाख ६१ हजार ५२९ लिटर, २०२०-२१ या वर्षात ८६ हजार ९८४ लिटर आणि २०२१-२२या वर्षात ८१ हजार ६० लिटर इतक्या दुधाचा पुरवठा करण्यात आल्याचे दिसून आले. त्यासंदर्भात दूध संघात सांगितल्यानंतर पाटील यांना योग्य दाखला देण्यात आला. याचा अर्थ बढे यांना बिनविरोध निवड करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी पाटील यांना खोटा दाखला देऊन फसवणूक करण्यात आल्याचा आरोप विशाल सोनवणे यांनी युक्तिवादात केला. यावरून जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थेच्या विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुरेंद्र तांबे यांनी निकाल दिला. यात त्यांनी पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात यावा, असा निकाल दिला. यामुळे रावेर गटात जगदीश बढे यांचे प्रतिस्पर्धी ठकसेन पाटील हे असतील, असे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा- ‘बंदीस्त कालव्यासाठी पालकमंत्र्यांकडून राजकीय दबाव’; आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप

दूध संघाच्या संचालकांच्या २० जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी छाननीत रावेर गटातून जगदीश लहू बढे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड निश्‍चित झाली होती. ते आधीच्या संचालक मंडळातही होते. बढे हे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र, ठकसेन पाटील यांनी उमेदवारी अर्ज बाद ठरविल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देत नाशिकच्या उपविभागीय उपनिबंधकांकडे (दुग्ध) धाव घेत आपला उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयावर आक्षेप घेत आपल्याला निवडणूक लढविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. पाटील यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्याच्या निकालाने बढे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. आता या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लक्ष वेधले गेले आहे.