लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत देताना बँक खात्यावर वर्गाचा धनादेश द्यावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी जिल्हा महिला ठेवीदार कृती समिती व खानदेश ठेवीदार कृती समिती (भुसावळ) यांच्यातर्फे संयुक्तपणे थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा महिला ठेवीदार कृती समितीच्या अध्यक्षा संध्या चित्ते आणि खानदेश ठेवीदार कृती समितीचे प्रवीणसिंह पाटील यांनी केले. जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या गैरव्यवहाराला सहकार विभागाकडून संरक्षण देण्यात येत असल्याने ठेवीदारांना अजूनही न्याय मिळाला नाही. त्यांना संपूर्ण संरक्षण ठेवी न देता वेठीस धरण्यात येत आहे. ठेवीदारांनी २००७ पासून ठेवीदारांना ठेवींपोटीची रक्कम बँक खात्यावर वर्गाचा धनादेश देण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा-जळगाव: जलतरण तलावात तरुणाच्या मृत्यूची तहसीलदारांकडून चौकशी

पाच हजारांवरील सर्व रक्कम बँक खात्यावर वर्गाचा धनादेशाद्वारे ठेवीदारांनी घेतली असता, कोणतीच अडचण आजपर्यंत आली नसल्याचे ठेवीदारांनी आंदोलनप्रसंगी सांगितले. जून २०२३ पर्यंत बँक खात्यावर वर्गाचे धनादेश पतसंस्थानिहाय द्यावेत. काळा हनुमान, फैजपूर मर्चंट, गुरुदेव मर्चंट, जय श्रीराम, बहिणाबाई (सावदा, आसोदा) या संस्थांसाठी विशेष अधिकारी नियुक्त करावा. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी दप्तर दिरंगाई करीत आहेत. २००७ पासून तारीखनिहाय कर्जमाफीचे १०१ दाखले दाखल असून, तारीखनिहाय मालमत्ता लिलावप्रक्रियेची सर्व संस्थांची चौकशी विशेष अधिकार्यांमार्फत करावी, अशी मागणी करण्यात आली.

Story img Loader