नाशिक: केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव तपोवन परिसरात होत आहे. महोत्सवात रामनगरीचे प्रतिबिंब दिसावे, यासाठी तपोवन परिसरात कंटेनरसह भिंती, कमानी, मैदान परिसर रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्रांनी सजत आहे. त्यामुळे या महोत्सवाला जणूकाही धार्मिक महोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाल्यासारखे दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
युवा महोत्सवाचा केंद्रबिंदू तपोवन परिसर असून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या अनुषंगाने केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकाने तपोवनासह ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत, त्या परिसराची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व अन्य अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली. केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकाने सुरक्षेचा आढावा घेत काही बदल सुचवले. पंतप्रधान मोदी यांचा रोड शो मिरची हाॅटेल ते तपोवन मैदान असा होणार असून त्या मार्गाचीही पाहणी करण्यात आली.
हेही वाचा… नाशिक : संशयिताकडून १५ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त
सुरक्षेच्या दृष्टीने तसेच गर्दी नियंत्रणात राहावी, यासाठी कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यातील दुभाजकांजवळ अडथळे उभारण्यात येत आहेत. कार्यक्रम स्थळी युध्दपातळीवर मंडप उभारणी, आसन व्यवस्था, व्यासपीठ यावर काम सुरू आहे. कार्यक्रम स्थळी बाहेरून येणाऱ्या लोकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी परिसरात मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहे. तपोवनाकडे येणाऱ्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर महोत्सवविषयक फलक झळकत आहेत. ठिकठिकाणी महोत्सवात होणाऱ्या कार्यक्रमांविषयी फलकांव्दारे माहिती देण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने सकाळीच तपोवनाच्या प्रवेशव्दारी असलेली कमान धुण्यात आली. तेथे असणाऱ्या विद्युत खांबाना तिरंगी कापड गुंडाळण्यात येणार आहे.
महोत्सव युवकांचा असल्याने या ठिकाणी पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात युवकांना केंद्रस्थानी ठेवत कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी कंटेनर, तपोवन शहर बस आगाराच्या भिंती यासह अन्य ठिकाणी रामायणातील हनुमान द्रोणागिरी उचलतांना, सीतामाता आणि हरिण, श्रीराम, राम दोहे, रामरक्षेतील काही श्लोक चितारण्यात तसेच रेखाटण्यात आल्याने परिसराला रामनगरीचे रुप प्राप्त झाले आहे.
तपोवन परिसरात चित्र रेखाटण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव यासह अन्य भागातून आठ कलाकार आले आहेत. श्रीराम नाशिकमध्ये वास्तव्यास असल्यापासून कर्नाटकातील अभयारण्यात जाईपर्यंतची चित्रे काढली जात आहेत. युवावर्गाशी संबंधित चित्रांऐवजी सर्व रामायणाशी संबंधित चित्रे चितारण्यात येत असल्याने हा युवा महोत्वस की धार्मिक महोत्सव, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.