धुळे: तीन गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने शहराजवळील मोहाडी गावातून अटक केली. त्याच्याकडून गावठी बंदूक व काडतूस जप्त करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहाडी परिसरात सुनील जाधव हा गावठी बंदूक बाळगून दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला सूचना केली. पथकाने मोहाडी गावात जाऊन सुनीलला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपयांची गावठी बंदूक, काडतुस आढळून आले.

हेही वाचा… नाशिक : सिडकोतून एक लाखाचा गुटखा जप्त

पोलिसांनी बंदूक व काडतूस जप्त केले. मोहाडी पोलिसात त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The accused who has three cases registered was arrested from mohadi village dhule dvr
Show comments