धुळे : शासन आपल्या दारी उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शहरात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन करणारे आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. जनतेच्या प्रश्नासाठी होणाऱ्या आंदोलनाची धास्ती घेत मध्यरात्रीपासूनच पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या दडपशाहीला शरण जात आपणास ताब्यात घेतल्याचा आरोप लोंढे यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एक दिवसाआड नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आवाहन सत्ताधारी भाजपने केले होते, मात्र जनतेच्या अपेक्षा फोल ठरवित धुळे मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजप आपल्या मस्तीत मस्त असल्याचा आरोप  लोंढे यांनी केला. यावेळी समता समाज संघाचे किरण गायकवाड, रिपाइं आठवले गटाच्या नैना दामोदर, अंजना चव्हाण, सोनल मराठे, नीलेश जिरे आदी उपस्थित होते.