नाशिक : मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गाच्या प्रगतीपथावर असलेल्या कामात सोमवारी इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे परिसरात अकस्मात पूल कोसळला. या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही. मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी टप्प्याचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाल्यानंतर वाहनांसाठी तो खुला करण्यात आला. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील महामार्गाच्या उर्वरित कामाला वेग देण्यात आला आहे. सिन्नर ते घोटी दरम्यान महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी परिसरात पुलाचे काम सुरू असताना तो कोसळला. मुख्य रस्त्यावरील पूल सायंकाळी अकस्मात कोसळल्याने कामगारांमध्ये घबराट पसरली.
समृध्दी महामार्गाचे काम सुरु असताना पूल कोसळला
मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी टप्प्याचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाल्यानंतर वाहनांसाठी तो खुला करण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 08-05-2023 at 22:38 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bridge collapsed while the work of samrudhi highway was underway ysh