नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेबद्दल राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. तर या भयानक दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शीनी त्यांचा दाहक अनुभव सांगितला आहे.

नाशिकमध्ये भीषण दुर्घटना!, खासगी बसला आग लागून ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची भीती

My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!
Rahu In Shani Nakshatra Gochar 2024
शनीच्या नक्षत्रात सोन्याचे दिवस, ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होणार सुरु; तुम्हाला कशी लाभेल श्रीमंती?
Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..
This is what happens to the body when you drink milk tea every day
तुम्ही रोज दुधाचा चहा प्यायला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा
Are you sleeping after 1 am? It can affect your mental health
Healthy sleep: तुम्हीही रात्री १ वाजता झोपता का? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम
Abandoned infants found by the side of the road A case has been registered against an unknown person Mumbai
रस्त्याच्या कडेला सापडले बेवारस अर्भक; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Benefits Of Eating Jamun
५० रुपयांना मिळणारा जांभूळ फळाचा वाटा तुमच्या शरीराला काय फायदे देतो वाचाच; जांभूळ खाण्याची परफेक्ट वेळ व पद्धत कोणती?
Eye witness told About Attack
VIDEO: काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सापडलेल्या भाविकानं सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग

“यवतमाळकडून आलेली प्रवासी बस आणि अमृतधामकडून येणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतला. बस इंजिन फुटलं होतं आणि डिझेलने पेट घेतला होता. पूर्ण बस जळू लागली, मागील बाजूने लोक आपला जीव वाचवण्यासाठी उतरत होते. पेटलेल्या अवस्थेत मिळेल त्या दिशेने सैरभैर पळत होते. रस्त्यावर काहीजणांचा पूर्णपणे कोळसा झाला.” असं प्रत्यक्षदर्शीने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

अग्निशमन दल वेळेत पोहचलं नाही –

तर “अवघ्या एक किलोमीटरवर अग्निशमन विभागाचे कार्यालय आहे, परंतु अग्निशमन दल वेळेत पोहचलं नाही. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. नंतर तातडीने सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी आले आणि कामाला लागले. सर्वजण सैरभैर पळत होते बस जळत होती, परंतु आगीच्या दाहकतेमुळे केवळ बघण्याशिवाय कोणीच काही करू शकत नव्हतं. जवळपास ४० जण बसमध्ये होते, त्यापैकी काहीजण सुस्थितीत बाहेर पडले, परंतु नंतर मात्र सर्व जळालेल्या अवस्थेत दिसत होते.” असंही ते म्हणाले.

आगीच्या दाहकतेमुळे बस जवळ कोणीच जाऊ शकत नव्हतं –

याशिवाय “जोपर्यंत प्रशासन घटनास्थळी पोहचलं नव्हतं, तोपर्यंत बसच्या आगीची दाहकता इतकी होती की कोणीच काही करू शकत नव्हतं. बसपासून साधारण ५० फुटांवर असलेला दिशा दर्शक बोर्डचेही बसला लागलेल्या आगीच्या दाहकतेमुळे नुकसान झाले. आगीच्या दाहकतेमुळे बस जवळ कोणीच जाऊ शकत नव्हतं, बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. प्रशासनास घटनास्थळी पोहचण्यास साधारण अर्धातास लागला तोपर्यंत अनेकांचा जळून मृत्यू झाला होता.” असं अन्य एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.

Nashik Bus Accident : मुख्यमंत्री शिंदेंनी मृतांच्या कुटुंबीयांना जाहीर केली ५ लाख रुपयांची मदत

पाहा व्हिडीओ –

आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले –

यवतमाळहून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ही बस निघाली होती. सकाळी सव्वा पाच वाजता ती या चौकात अपघातग्रस्त झाली. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. ११ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. बस, डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला. डंपरचालक फरार आहे. अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.