लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: शासन आपल्या दारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम २७ जून रोजी जळगावात होणार असल्याने सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी एकमेकांशी समन्वय राखून पार पाडून यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम २७ जूनला पोलीस कवायत मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विभागप्रमुखांची बैठक जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहायक जिल्हाधिकरी अर्पित चौहान आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मित्तल यांनी सर्व विभागांनी आपल्यावर सोपविलेली कामाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, अशी सूचना केली. कार्यक्रमास २५ हजारांपेक्षा अधिक लाभार्थी उपस्थित राहणार असल्याने नियोजन करावे.
हेही वाचा… नाशिकरोडमधील जल वाहिनीला गळती; दुरुस्तीमुळे बुधवारी चार प्रभागात पाणी पुरवठा बंद
वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, वाहनतळ, आरोग्य व्यवस्था, लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, लाभार्थ्यांना लाभाचे वाटप याबाबतचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे सांगितले. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्ह्यातील ७५ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भारदे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली.