नाशिक : आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपने शहराप्रमाणे ग्रामीण भागातही सक्रिय पदाधिकाऱ्यांना सढळहस्ते पदांचे वाटप करुन संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपने जिल्हा ग्रामीणच्या (उत्तर) २०२३- २०२६ या वर्षासाठी जाहीर केलेल्या कार्यकारिणीतून तेच अधोरेखीत होत आहे. नाशिक ग्रामीण (उत्तर) जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सुधाकर पगार, सोनाली जाधव, प्रमोद सस्कर ,ललिता कुवर, सचिन निकम, किशोर चव्हाण, मोहन शर्मा, माणिक देसाई, निशा जाधव, सोनाली पाटील या १० उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस पदाची जबाबदारी भूषण कासलीवाल, सुवर्णा जगताप. पंढरीनाथ पिठे, आनंद शिंदे, संजय सानप, संतोष केंद्रे असे सहा जण सांभाळणार आहेत. चिटणीसपदी १३ जणांची नियुक्ती करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून गोविंद कोठावदे, भाजप कार्यालय प्रमुख- कुणाल खैरनार, युवा मोर्चा अध्यक्ष – सुनील पवार, महिला मोर्चा अध्यक्ष जान्हवी कदम यासह अन्य मोर्चाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> प्रती गोदावरी एक्स्प्रेसमधील गणरायाच्या प्रवासात वाढ

शहराप्रमाणे विविध कक्षाच्या (सेल) माध्यमातून सर्व घटकांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात किसान मोर्चापासून ते पूर्व सैनिक आघाडीपर्यंतचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून बरीच मोठी यादी असून विशेष निमंत्रितांमध्ये पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, नव्या कार्यकारिणीत सर्व घटकांना स्थान देण्याची धडपड करण्यात आल्याचे दिसत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The executive of bjp zilla gramin allotment of posts ysh