नाशिक: दीपावलीच्या पार्श्वभूमिवर, खाद्य पदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील मालदे शिवारात मसाले उत्पादक कंपनीवर छापा टाकण्यात आला. भेसळीच्या संशयाने लाखो रुपयांचा मसाला आणि मिरची पावडर जप्त करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दीपावलीनिमित्त मिठाई दुकानांसह मसाले उत्पादक कंपन्यांची तपासणी करण्यात येत आहे. भेसळ करण्यात आल्याचे सिध्द होताच कारवाई करण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यातील मालदे शिवार परिसरात एसईए-एमए मसाले प्रॉडक्ट प्रा. लि. या मसाले उत्पादक कंपनीची अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी तपासणी केली. मसाले आणि मिरची या घटकांमध्ये रंग टाकण्यास बंदी असताना या ठिकाणी संबंधित खाद्य रंग साठविलेला आढळला.

हेही वाचा… कैद्यांनी केलेल्या निर्मित वस्तूंचे प्रदर्शन, विक्री केंद्राचे उद्घाटन

देशमुख यांनी रंगाचा वापर अन्न व्यवसायिकाने टिका फ्राय मसाला आणि मिरची पावडरमध्ये केला असल्याचा संशयावरून २४ हजार रुपयांचा टिका फ्राय मसाला आणि माहितीपट्टी नसलेल्या पिशवीत सुमारे एक लाख, ६१ हजार ४०० रुपयांची ५३८ किलो मिरची पावडर ताब्यात घेतली. दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

Story img Loader