नाशिक – सर्वांना शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत शाळांना शिक्षण विभागाकडून देण्यात येणारी रक्कम न मिळाल्याने सिध्दी जनकल्याण वैद्यकीय शैक्षणिक संस्था संचलित सिद्धी इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्व. सौ. सुशीलाताई प्रभाकर सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील सर्व शिक्षण हक्क अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांची संस्थेकडून अडवणूक होत असल्याची पालकांची तक्रार आहे.

संबंधित शाळेत सर्वांना शिक्षण हक्क अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. या अनुषंगाने शिक्षण विभागाकडे सिध्दी शाळेचे ५८ लाख ३७ हजार ६०० रुपये तर, सुशीलाताई सोनवणे शाळेचे दोन लाख, ७९ हजार ५०० रुपये प्रलंबित आहेत. याबाबत अनेक वेळा संस्थेच्या संचालकांनी पत्राद्वारे व वैयक्तीक भेटत ही रक्कम मिळावी, म्हणून निवेदन दिले. परंतु, कागदपत्रांमध्ये कमतरता दाखवत निधी देण्याचे टाळले जात आहे. हेतुपुरस्सर हा निधी देणे टाळले जात असल्याचा आरोप पालकांनी केला. न्यायालयात प्रकरण दाखल होऊनही टाळाटाळ होत आहे. संस्था आणि शिक्षण विभाग यांच्यातील चालढकलीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पंधरा दिवसांत संस्थेकडे पैसे जमा न झाल्यास मुलांसह शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
anticipatory bail application of illegal school principal rejected by pune court
बेकायदा शाळेच्या मुख्याध्यापिकेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Retired teacher and his son got cheated for Rs 30 lakhs Accuseds bail application rejected
निवृत्त शिक्षकासह मुलाची ३० लाखांची फसवणूक; आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
Devendra Fadnavis expressed regret over the chaos happening in universities Nagpur news
मुख्यमंत्रीच म्हणतात, विद्यापीठांमध्ये अराजकतेचे बिजारोपण…कारण, माओवादी विचार…
teaching being hampered due to various committees are being formed
अबब, राज्यातील शाळांत १८ समित्या! शिक्षक मग शिकवितात केव्हा?
Unauthorized school, education officer,
अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास आता शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई

हेही वाचा >>>जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर धडक कारवाई, तापीतून तराफ्याच्या सहाय्याने वाळू वाहतूक

सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत पाच वर्षाचे ८५ विद्यार्थ्यांचे सहा लाखांहून अधिक पैसे संस्थेला येणे बाकी आहे. शिक्षण विभागाला निवेदन दिल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने पालकांना नाईलाजाने मुलांचे शिक्षण थांबवावे लागेल, असे सांगावे लागले. पालकांनी या पार्श्वभूमीवर बुधवारी आंदोलन केले. शाळेची आर्थिक परिस्थिती नाजूक असून दोन वेळा लिलाव झाला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बुधवारी चर्चा झाली असून त्यांनी पुन्हा एकदा कागदपत्र जमा करा, लवकरच पैसे जमा होतील, असे आश्वासन दिले आहे.- डॉ. प्रदिप सोनवणे (मुख्याध्यापक, सिध्दी इंटरनॅशनल स्कूल)

Story img Loader