लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: गांधीनगर येथील आर्टिलरी सेंटरच्या प्रवेशव्दाराजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात सोमवारी सकाळी बिबट्या जेरबंद झाला. गांधीनगर जवळील आर्टिलरी सेंटर परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने तेथे बिबट्याचा वावर वाढला आहे. गांधीनगरजवळ आर्टिलरी सेंटरचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी निवासी घरे बांधण्यात आली आहेत. परिसरात घनदाट झाडी असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे.

पाच ते सहा दिवसांपासून परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. आर्टिलरी सेंटर प्रशासनाने मुख्य वनरक्षक विवेक भदाणे यांच्याकडे परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्याविषयी पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राची दखल घेत वन विभागाने पिंजरा लावला होता. त्या पिंजऱ्यात सोमवारी सकाळी बिबट्या अडकला. त्याच्या डरकाळ्यांनी परिसरातील नागरीकांना बिबट्या जेरबंद झाल्याचे लक्षात आले.

हेही वाचा… धुळे : बनावट बियाणांची विक्री थांबविण्यासाठी पाच भरारी पथके

याविषयी वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षितरित्या बिबट्याला हलविण्यात आले. बिबट्या मादी असून पाच वर्षांचा आहे. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

Story img Loader