लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची माहिती स्थानकांवर नेहमीच दिली जाते. पण लांब पल्ल्याची प्रवासी गाडी चक्क एक तास आधीच आली आणि लगेचच पुढे मार्गस्थ झाली तर…असाच काहीसा प्रकार गुरुवारी सकाळी मनमाड रेल्वे स्थानकात घडला. वेळेपूर्वीच आलेली गोवा एक्सप्रेस लगेचच कशी रवाना झाली. याबद्दल आता रेल्वे प्रशासन चौकशी करीत आहे. रेल्वेगाडीचे असे लवकर येऊन मार्गस्थ होणे प्रवाशांसाठी तापदायक ठरले.

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Property worth 61 crore seized during elections period from backward Vidarbha
मागास विदर्भ निवडणूक काळात संपन्न, ६१ कोटींची मालमत्ता जप्त
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त

गाडी क्रमांक १२७७९ वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस या गाडीबाबत हा प्रकार घडला. तिची दररोज मनमाड रेल्वे स्थानकात येण्याची वेळ सकाळी १०. ३० वाजेची आहे ही गाडी दौंड, मनमाडमार्गे दिल्लीसाठी जात असते पण, गुरुवारी सकाळी गोवा एक्स्प्रेस या रेल्वे स्थानकात चक्क सकाळी ९.३० वाजता आली. पाच मिनिटाच्या अंतराने लगेचच मार्गस्थ झाली. या गाडीने दिल्लीपर्यंत प्रवासाचे आरक्षण करणाऱ्या ४५ पेक्षा अधिक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाडी वेळेच्या एक तास अगोदरच रवाना झाली. त्यामुळे प्रवासी संतापले. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

हेही वाचा… नाशिक: एक लाखाचा गुटखा जप्त; दुकानावर कारवाई

अखेर रेल्वेने याच मार्गाने धावणाऱ्या १२८५९ मुंबई-हावडा गितांजली एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात विशेष थांबा देऊन गोवा एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या आणि आरक्षण केलेल्या ४५ हून अधिक प्रवाशांना गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसविले. पुढे मार्गस्थ झालेली गोवा एक्सप्रेस जळगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली. गीतांजली भुसावळ स्थानकात पोहोचल्यानंतर गोवा एक्सप्रेसचे आरक्षण असलेल्या प्रवाशांना पुन्हा त्यांच्या मूळ गाडीत म्हणजे गोवा एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. परिणामी, प्रवाशांना द्राविडी प्राणायाम करावा लागला. या सर्व प्रकाराला रेल्वे प्रशासन आणि संबंधित विभागाची मोठी चूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मार्ग बदलल्याने वेळेपूर्वीच आगमन

गाडी क्रमांक १२७७९ वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस वास्को येथून सुटते आणि हुबळी, मिरज, पुणे, दौंड, मनमाडमार्गे ती दिल्लीसाठी मार्गस्थ होते. सकाळी १०.३० वाजता तिचा दररोजचा वेळ आहे. दोन दिवसांपासून कर्नाटकमधील हुबळी भागात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळत आहेत. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या प्रवासी रेल्वे गाड्यांचा मार्ग हुबळी-पुणे-मिरज ऐवजी रोहा-पनवेल-कल्याणमार्गे वळविण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी गोवा एक्स्प्रेस ही तिच्या नियमित मार्गाने न जाता वळविण्यात आल्यामुळे ही गाडी गोवा,रोहा, पनवेल, कल्याणमार्गे मनमाडला दाखल झाली. पण मार्ग बदलण्यात आल्यामुळे ती मनमाड रेल्वे स्थानकात तिच्या नियोजित वेळेपेक्षा चक्क एक तास आधीच दाखल झाली.

गाडी नियोजित वेळेआधीच येऊन निघून गेल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. हा गोंधळ लक्षात येताच मुंबईहून हावडाला जाणाऱ्या गितांजली एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात थांबा नसतानाही प्रवाशांच्या सोयीसाठी गुरुवारी सकाळी ती थांबविण्यात आली. गोवा एक्सप्रेसच्या आरक्षित रेल्वे प्रवासी तिकीटधारकांना तिकीट तपासणी पथकाने गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसविले. नंतर गीतांजली मार्गस्थ झाली. पुढे गेलेली गोवा एक्सप्रेस जळगाव स्थानकात थांबवून ठेवण्यात आली. गीतांजली भुसावळ येथे गेल्यानंतर या प्रवाशांना पुन्हा त्यांच्या नियोजित गोवा एक्सप्रेसमध्ये बसवून देण्यात आले. या नियोजनात रेल्वे प्रशासनाची धांदल उडाली.

वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस गाडीचा नियमित मार्ग गुरुवारी बदलण्यात आल्यामुळे ही गाडी मनमाड स्थानकात एक तास आधीच पोहोचली व लगेच मार्गस्थ झाली. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या ४५ पेक्षा अधिक प्रवाशांना मागून येणाऱ्या गितांजली एक्सप्रेसमध्ये बसवून देण्यात आली. गोवा एक्सप्रेस नियोजन वेळेआधीच आल्यामुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला. ही पूर्णतः रेल्वेच्या संबंधित विभागाची चूक असल्याचे लक्षात आले. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल. – शिवराज मानसपुरे (मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई)