लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मालेगाव: नव्याने बांधकाम झालेल्या मालमत्तांसाठीच्या घरपट्टी करामध्ये मालेगाव महापालिकेतर्फे वाढ करण्यात आली आहे. घरपट्टी वाढविण्याच्या प्रशासनाच्या कृतीस राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. ही दरवाढ रद्द करावी अन्यथा महापालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख आसिफ शेख यांनी दिला आहे.

नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने तसेच निवडणुका लांबणीवर पडत असल्यामुळे एक वर्षापासून महानगर पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त भालचंद्र गोसावी प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार सांभाळत आहेत. हा कारभार हाकताना गोसावी यांनी शहरवासियांना विश्वासात न घेता किंवा त्यांच्या भावनांची कदर न करता शहरात नव्याने बांधकाम झालेल्या घरांच्या मालमत्ता करात अवास्तव वाढ केल्याची तक्रार आसिफ यांनी केली. या संदर्भात आसिफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त गोसावी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

हेही वाचा… आमच्यासारखा जन्म घ्या; तृतीयपंथींची भाजप नेत्यांवर टीका; धरणगावात ठाकरे गटातर्फे निषेध आंदोलन

सध्या घरपट्टी विभागाद्वारे संपूर्ण शहरात वाढीव दरानुसार घरपट्टी देयकांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मालेगाव शहर हे यंत्रमागाचे शहर असून दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या येथे मोठी आहे. राज्यातील इतर ठिकाणांहून आलेल्यांची संख्याही अधिक आहे. गरीब कामगारांपुढे प्रपंच सांभाळण्यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अधिक आर्थिक बोजा ते सहन करु शकत नाहीत.

हेही वाचा… राजकीय संघर्षाचे सावट शासन आपल्या दारी वर न पडण्यासाठी दक्षता – पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू

या गोरगरीब जनतेवर लादलेला वाढीव कराचा बोजा अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असल्याचेही आसिफ यांनी निवेदनात म्हटले आहे. आगामी काळात महापालिकेची निवडणूक झाल्यावर जर महासभेने घरपट्टीच्या दरवाढीस मंजुरी दिली तर नव्या दराने घरपट्टी आकारणी करता येऊ शकेल. मात्र प्रशासकांनी आपल्या अधिकारात अशी दरवाढ करणे योग्य नसल्याचे नमूद करत वाटप केलेली देयके येत्या दहा दिवसात परत घ्यावीत असा आग्रह आसिफ यांनी धरला.