लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे: तालुक्यातील मोराणे गावात बनावट दारू तयार करुन विक्री करण्यात येणारा अड्डा पोलिसांनी उदध्वस्त केला. दारू तयार करण्याचे साहित्य, बाटल्या असा ९० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून तिघांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोराणे येथील एका बंद घरात बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाल्यानंतर पथकाने संशयित घरावर छापा टाकला. पोलिसांनी सहा हजार ४८० रुपयांच्या बाटल्या, चार हजार ३२० रुपयांचे किंमतीचे लेबल, भ्रमणध्वनी, मोटार सायकल असा सुमारे ९० हजार ७१४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा… कनिष्ठ सहायकाची हिंमत बघा, शाखा अभियंत्याकडून लाच घेतली

मलिंदरसिंग शिकलकर (२७, रा.राजीव गांधी नगर,गुरुकुल शाळेजवळ धुळे), रमेश गायकवाड (४५, रा.चितोड भिलाटी, धुळे) आणि भिलू साळवे (३०, रा.यशवंत नगर, साक्री रस्ता, धुळे) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.