धुळे: महानगर पालिकेने सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम दिली नसल्याने सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने सहकुटूंब महानगरपालिका प्रवेशद्वारासमारे वाद्य वाजवून ‘आवाज सूनो’ आंदोलन केले. निवृत्त शिक्षकांची दोन कोटी २२ लाख ५० हजार रुपयांची थकीत रकम तातडीने द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष सुरेश जाधव, सरचिटणीस मधुकर वाणी यांसह इतर सेवानिवृत्त शिक्षक सहभागी झाले होते. निवृत्त शिक्षकांच्या संघटनेने महापालिकेला दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे. महानगर पालिकेच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाच्या ५० टक्के थकीत फरकाची रक्कम मिळालेली नाही. तसेच जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीतील सातव्या वेतन आयोगाची ५० टक्के रक्कमही मनपाने दिलेली नाही.

हेही वाचा… पोलीस मदतवाहिनीवर तक्रारी, सूचनांचा पाऊस; नाशिककरांचा प्रतिसाद

मनपाकडे सेवानिवृत्त शिक्षकांची ५० टक्के हिश्याची दोन कोटी २२ लाख ५० हजार रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी त्वरीत न दिल्यास दररोज ११ ते १२ या वेळेत महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर वाद्य वाजविण्याचे आंदोलन चालू राहील, असा इशारा सेवानिवृत्त शिक्षकांच्या संघटनेने दिला आहे.

Story img Loader