नाशिक – सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने कांद्याची चोरी होऊ लागली असून देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडीतून कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्राॅली चोरीस गेली आहे. याविषयी देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सरस्वतीवाडीतील शेतकरी विजय आहेर यांच्या मालकीची ट्रॅक्टर ट्राॅली कांदा भरुन चाळीत उभी केलेली असताना सोमवारी रात्री चोरीस गेली. मंगळवारी सकाळी चाळीत पाहिले असता ट्रॅक्टर दिसला नाही. आहेर यांनी याबाबत आपल्या जवळच्या लोकांना माहिती दिली. ट्रॅक्टरची परिसरात शोधाशोध सुरू केली. देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असून, चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरमध्ये आजच्या बाजार भावानुसार जवळपास दीड लाख रुपयांचा माल भरलेला होता. या चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून, चोरांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

हेही वाचा >>>जळगाव जिल्ह्यात शिवशाहीवर कार आदळल्याने तिघांचा मृत्यू

भाव वाढल्यावर कांदा चोरीचे प्रकार

दहा वर्षांपूर्वी कांद्याला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल असा दर मिळला होता. त्यावेळी सटाणा बाजार समितीच्या आवारातून किकवारी आणि धांद्री येथील शेतकऱ्यांचे कांदे भरलेले ट्रॅक्टर चोरीला गेले होते, चोरांनी कांद्याची परस्पर विल्हेवाट लावून ट्रॅक्टर रिकामे करून रस्त्यालगत असलेल्या खळ्यात आणून सोडले होते. अशा घटना आता पुन्हा होऊ लागल्याने आजूबाजूला तसेच शेजारच्या बाजार समित्यांमध्ये बारकाईने लक्ष ठेवून चोरांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला जावा,- कुबेर जाधव (समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना)