नाशिक – दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील सरपंच माधव उगले यांच्या द्राक्षबागेतील झाडे कुऱ्हाडीचे घाव घालून कोणीतरी तोडल्याने बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नाशिक : जिल्ह्यात एकाचवेळी ४६ दारू अड्ड्यांवर छापे

सरपंच उगले यांची जोपुळ – पिंपळगाव रस्त्यावर द्राक्षबाग आहे. बागेचे नुकसान करणाऱ्यांनी पावडर फवारणीचे यंत्र, वजन काटा चोरून नेला. आठ दिवसांपूर्वीदेखील उगले यांच्या द्राक्ष बागेतील काही झाडे तोडण्यात आली होती. त्यानंतर आठवड्यानंतर कोणीतरी ८० द्राक्षांची झाडे जमिनीपासून सुमारे चार ते पाच इंचावर तोडून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान केले आहे. यानंतर उगले यांनी तात्काळ वणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीलेश बोडके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.