नाशिक: दिवाळीच्या पहिल्या दिवशी जल वाहिनीच्या गळतीमुळे उद्भवलेले जल संकट ताजे असतानाच आता देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी पुन्हा एकदा नऊ प्रभागातील नागरिकांना त्याच संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. गांधीनगर जल शुध्दीकरण केंद्राशी संबंधित विविध कामांमुळे गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस आठ प्रभागात तर, अन्य एका प्रभागात एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नाशिकरोड विभागातील हा बहुतांश परिसर आहे.

दिवाळीत पाणी पुरवठा, पथदीप व्यवस्था सुरळीत राखण्याचे निर्देश देऊनही याच काळात शहरवासीयांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्राजवळील जल वाहिनीला लागलेल्या गळतीमुळे सातपूर आणि नाशिक पश्चिममधील अनेक प्रभागातील नागरिकांना दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. आसपासच्या कुपनलिकेतून पाणी भरून आणण्यापासून ते खासगी टँकरने पाणी मागवण्यापर्यंत कसरत करावी लागली. विस्कळीत पाणी पुरवठ्याने टँकरचालकांची मात्र दिवाळी झाली. आता जल वाहिनीच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष

हेही वाचा… Video : सलमान खानच्या फॅन्सनी चक्क चित्रपटगृहात फटाके फोडत ‘टायगर ३’चे केले स्वागत, मालेगावमधील धक्कादायक प्रकार

गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्रास बारा बंगला पंपिंग येथून जल वाहिनीतून पाणी पुरवठा होत आहे. गांधीनगर केंद्राची जलशुध्दीकरण क्षमता ५२.०० एम.एल.डी. आहे. या केंद्राच्या उभारणीनंतर जागेची अडचण विचारात घेता जमिनीखाली साठवण व्यवस्था (सम्प हाऊस) केलेली नव्हती. या केंद्राद्वारे गांधीनगर येथील चार जलकुंभ, आय. टी. पार्क, विद्याविहार, कल्पतरू, इच्छामणी व शिवशक्ती जलकुंभ भरण्यात येतात. तसेच प्रभाग क्रमांक १६, २३ आणि ३० या नाशिकरोड येथील परिसरात पाणी पुरवठा केला जातो. या भागातील वाढीव पाण्याची मागणी पुरविण्यासाठी जमिनीखाली ११ लाख लिटर जलसाठ्यासाठी व्यवस्था उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आहे. सध्या अस्तित्वातील व्यवस्था सम्प हाऊसला जोडणी करण्यासाठी जल वाहिनीची वेगवेगळी कामे करावी लागणार आहेत. या कामांसाठी तांत्रिकदृष्ट्या ३६ तासांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुुळे गुरुवार आणि शुक्रवार या कालावधीत आठ प्रभागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे. शनिवारी पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. याची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे महापालिकेने म्हटले आहे.

गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणारे आठ प्रभाग

प्रभाग क्रमांक १७ मधील लोखंडे मळा, खर्जुल मळा, सप्तश्रृंगीनगर, शिवरामनगर, टाकळी रोड परिसर, इच्छामणीनगर, कॅनाॅल रस्ता, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, शिवाजीनगर, एम.एस.सी.बी. कॉलनी, नवरंग कॉलनी, वाघेश्वरी नगर व अन्य भाग. प्रभाग १८ मधील शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गांव, सायखेडा रस्ता, भगवा चौक, शिवशक्तीनगर, वाघेश्वरनगर, बालाजीनगर, भगवती लॉन्स परिसर, प्रभाग १९ मधील गोरेवाडी, चेहेडी परीसर, नाशिक-पुणे महामार्ग, एकलहरा रस्ता, सामन गाव. प्रभाग २० मध्ये पुणे रस्ता, डावखर वाडी, जयभवानी रोड, अश्विन कॉलनी, जेतवननगर, बिटको महाविद्यालय तरण तलाव. प्रभाग २१ मधील जयभवानी रोड, सहाणे मळा, लवटे नगर एक व दोन, रोकडोबा कॉलनी, आर्टिलरी केंद्र रस्ता, दत्त मंदिर रस्ता, प्रभाग २२ मध्ये विहितगाव, सौभाग्यनगर, लामरोड, वडनेर गाव परिसर, वडनेर रस्ता, प्रभाग २३ मधील रविशंकर मार्ग, पखाल रोड, खोडेनगर, निसर्ग कॉलनी, विधातेनगर, बँक कॉलनी, डीजीपी. नगर, अशोका मार्ग, वडाळा रोड, जयदिपनगर, साईनाथनगर, अमृत वर्षा कॉलनी, गणेश बाबानगर, कल्पतरु नगर, आदित्यनगर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रेहनुमा नगर, गोदावरी नगर, ममता नगर व इतर परिसर आणि प्रभाग ३० मधील वडाळा गाव या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

शुक्रवारी नऊ प्रभागात पुरवठा बंद

पाणी पुरवठा व्यवस्थेतील कामांमुळे शुक्रवारी उपरोक्त आठ प्रभागांसह प्रभाग क्रमांक १६ मधील उपनगर, शांतीपार्क, अयोध्यानगर, मातोश्रीनगर, शिवाजीनगर, आरटीओ कॉलनी, तोरणा सोसायटी, समतानगर, टाकळी गाव, रामदास स्वामी मठ, उत्तरानगर, आदिवासी वाडा, जयभवानीनगर, पगारे मळा, रामदास स्वामीनगर, श्रमनगर एक व दोन, सिंधी चाळ, इच्छामणी मंदीर परिसर, मकरंद कॉलनी, रघुवीर कॉलनी, आंबेडकरनगर, पंचशीलनगर, राहुलनगर, शांती पार्क, पंजाब चाळ, रामदास स्वामी मठ व अन्य भाग अशा एकूण नऊ प्रभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.