लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे: शहरातील वेगवेगळ्या भागातून चार मोटरसायकलींची चोरी करण्यात आली आहे. शहरातील वालचंद बापूजी नगरातील संदीप सोनवणे (रा. मोहाडी) यांच्या घराच्या अंगणातून २० हजार रुपयांची मोटरसायकल चोरीस गेली. याप्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसरी चोरी लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी झाली.

बापू वेंदे (रा.नवनाथ नगर, साक्री रोड) यांच्या मालकीची २० हजार रुपयांची मोटरसायकल चोरीस गेल्याने मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी चोरी लोकरे नगरात झाली. विष्णू कुटे यांच्या मालकीची १५ हजार रुपयांची मोटरसायकल चोरीला गेली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा… कांद्यावरून सुंदोपसुंदी; निर्यातशुल्काला वाढता विरोध

चौथी घटना देवपूरमधील हॉटेल रसराजच्या वाहनतळात झाली. दत्तात्रय पाटील (रा.प्रमोद नगर, देवपूर) यांच्या मालकीची ५० हजार रुपयांची मोटरसायकल चोरीला गेली. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft of four bikes from dhule dvr