लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : निफाड तालुक्यातील विंचूर येथे नाशिक-येवला रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मोटारीतून आलेल्या चोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने तोडून लाखो रुपयांची रक्कम लुटून नेली.

Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
Immigration policy of Donald Trump
अन्यथा : प्रगतीच्या प्रारूपाचा प्रश्न!
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले

रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर फवारा मारला. त्यानंतर एटीएममधील सर्व रक्कम घेऊन ते फरार झाले. एटीएममध्ये गडबड होत असल्याचा संगणकीकृत संदेश लासलगाव पोलीस ठाण्यात येताच तातडीने सहायक निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत चोरटे फरार झाले होते. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एटीएममध्ये सुमारे ३३ लाख रुपये भरण्यात आले होते, असे समजते.

आणखी वाचा- सर, सहल दिवाळीपूर्वी नेली असती तर…जगाचा निरोप घेणाऱ्या सहावीतील मानसीच्या पत्राने शिक्षकांना गहिवर

निफाडचे पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे हेदेखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लासलगाव पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली असून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.