लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी तुरळक गर्दी होती. मात्र, नऊनंतर मतदान केंद्रांत रांगा लागल्या. जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रात सोयी-सुविधा पुरविण्याचा दावा केला असला, तरी अनेक मतदान केंद्रात पाण्याची व्यवस्थाच नव्हती. मतदान केंद्रात पाण्याचे जार रिकामेच होते. त्यामुळे मतदारांची उन्हात पाण्याविना जीवाची काहीली झाली.

सकाळी ११ पर्यंत जळगाव मतदारसंघात १६.८९, तर रावेर मतदारसंघात १९.०३ टक्के मतदान झाले होते. सकाळी तुरळक गर्दी होती. मात्र, नऊनंतर मतदान केंद्रांत रांगा, दुपारी एकनंतर पुन्हा गर्दी कमी झाली. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ मिळून तीन हजार ८८६ केंद्रांत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या १५ सोयी-सुविधा पुरविण्याचा दावा केला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी शुद्ध पाणी, सावलीसाठी मंडप यांसह विविध सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शहरातील अनेक मतदार केंद्रांवर या सुविधांचा अभाव दिसून आला.

आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यात सरकारच्या निषेधार्थ कांद्याची माळ घालून मतदान

पिंप्राळा उपनगरातील बालमोहन विद्यालय, पी. एम. मुंदडे, महापालिका शाळा यांसह विविध शाळा-महाविद्यालयांतील मतदान केंद्रांत थंड पाण्याचे जार ठेवण्यात आले. मात्र, त्यातील पाणी सकाळी नऊपर्यंत संपले होते. त्यानंतर शुद्ध पाणी पुरविण्याची तसदी घेण्यात आली नसल्याचे चित्र दिसून आले. सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र, सकाळी नऊनंतर ऊन पडू लागले. त्यामुळे दुपारनंतर उष्णतेच्या झळांनी मतदार घामेघूम झाले होते. मतदारांच्या घशाला कोरड पडू लागली होती. त्यामुळे प्रशासनावर रोष व्यक्त केला जात असल्याचे दिसून आले.