नाशिक – काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी शहरात काढलेल्या रोड शोदरम्यान झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात धुवून घेतले. अनेकांची पाकिटे, भ्रमणध्वनी, दागिने लंपास झाले. सुमारे पावणेचार लाख रुपयांपर्यंत ऐवजांची चोरी झाली आहे.

काँग्रेसतर्फे भारत जोडो न्याय यात्रेत गुरुवारी दुपारी द्वारका ते शालिमार या दरम्यान गांधी यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख चौकात ठिकठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी व समर्थक स्वागतासाठी जमले होते. रोड शोचा शालिमार येथे समारोप झाला. या ठिकाणी गांधी यांची चौकसभा झाली. रोड शोचा मार्ग आणि चौकसभेच्या ठिकाणी गर्दी होती. या गर्दीचा फायदा काही चोरट्यांनी घेतल्याचे उघड झाले.

हेही वाचा – पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?

हेही वाचा – सातारा : रोहित शेट्टी यांच्या सिंघम – थ्री चित्रीकरणाने वाईचा गणपती मंदिर परिसर उजळला

हेही वाचा – नागरिकांनी हक्कासाठी लढले पाहिजे – राहुल गांधी

या संदर्भात बांधकाम व्यावसायिक पुरवठादार राजू कापसे यांनी तक्रार दिली. कापसे हे रोड शोमध्ये सहभागी झाले होते. द्वारका भागात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील पाकिटावर डल्ला मारला. द्वारका ते शालिमार दरम्यान कुणाचे भ्रमणध्वनी गेले, कुणाची रोकड तर कुणाचे दागिने लंपास झाले. चोरट्यांनी अनेकांना हिसका दाखवला. रोड शोत एकूण तीन लाख ६३ हजारांहून अधिकचा ऐवज लंपास झाला. यात दागिने, भ्रमणध्वनी व रोकडचा समावेश असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Story img Loader