नाशिक – सिन्नर औद्योगिक वसाहतीत कोयत्याचा धाक दाखवून २० लाख रुपये असलेली बॅग पळविणाऱ्या चोरट्यास गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माळेगाव येथील भगवती स्टिल कंपनीचे कंत्राटी पर्यवेक्षक चंद्रदीपकुमार सिंग (रा. सिन्नर) त्यांच्या कंपनीतील कामगार दीपचंद्र जयस्वार यांच्या दुचाकीवरून कामगारांच्या पगाराची रक्कम २० लाख ५३ हजार रुपये बॅगेतून घेऊन जात असताना चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवित बॅग लंपास केली. या प्रकरणी सिन्नर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – धुळे: पाच हजार वाहन चालक परवान्याच्या प्रतिक्षेत; अडीच महिन्यांपासून काम बंद

पोलीस निरीक्षक शाम निकम यांनी पथकासह घटनास्थळास भेट देत भगवती स्टील कंपनीच्या परिसराची पाहणी केली. संशयिताची माहिती मिळाली असता घटना घडल्यापासून तो दिसून आलेला नसल्याचे समजले. सिन्नर येथून पत्नीला घेऊन तो बाहेरगावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचत संशयित आदित्य सोनवणे (२४, रा. शांतीनगर, सिन्नर) याला अटक केली. आदित्यने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरून नेलेल्या रकमेपैकी १८ लाख ९४ हजार ५०० रुपये त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. आदित्य सराईत गुन्हेगार असून अहमदनगरच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief who loot workers salary arrested by police ssb
Show comments