१८ घटनांमध्ये आठ लाखांचा ऐवज लंपास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहर परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ सुरूच असून वेगवेगळ्या १८ घटनांमध्ये सुमारे आठ लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केल्यामुळे शहरात राज्य पोलिसांचे की चोरटय़ांचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारात महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेणे, चारचाकी- दुचाकी वाहने व भ्रमणध्वनी चोरीचा समावेश आहे.

मागील काही महिन्यात शहरात गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. चोरी व घरफोडय़ांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. हे प्रकार नियंत्रणात आणण्यात पोलिसांना अपयश आल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. सोमवार हा दिवस चोरटय़ांसाठी जणू पर्वणी ठरली. अंबड, नाशिकरोड, उपनगर, पंचवटी यासह १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरटय़ांनी आपली करामत दाखविली.  पी.एन.टी कॉलनीतील कल्पना शिंपी या मुलीसोबत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी सोनसाखळी ओरबाडून नेली. याच घटनेची पुनरावृत्ती चोपडा लॉन्स परिसरात घडली. मीना काळे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत पल्सरवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेली.

आडगाव येथील रहिवासी दादा सोळंके यांची घराबाहेर लावलेली अल्टो कार चोरटय़ांनी लंपास केली. गंगापूर गावातील रहिवासी सोमनाथ डंबाळे यांच्या घरासमोरून दुचाकी चोरटय़ांनी चोरून नेली. उपनगर परिसरातील आडके नगर येथेही महेशकुमार सोळंके यांच्याबाबत असाच प्रकार घडला. त्यांच्या मालकीची दुचाकी चोरटय़ांनी लंपास केली. सातपूर येथील गुलमोहर कॉलनी येथून रमेश गुरडी यांची दुचाकी तर नेहरू चौकातील दिल्ली दरवाजा परिसरात बुलेट चोरटय़ांनी पळवून नेली. त्र्यंबक कॉलनी येथील ओमशांती बंगल्यात राहणारे निर्मलचंद्र धुमाळ हे मेळा बस स्टॅण्ड ते त्र्यंबक रोड असा रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षातील संशयितांनी त्यांच्याकडील २० हजार किंमतीचा भ्रमणध्वनी लंपास केला. पेठ रोड येथे स्नेहल विसपुते यांच्या घरातुन चोरटय़ांनी चांदीचे जोडवे, चांदीची अंगठी व रोख रक्कम असा १९ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.