लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : शस्त्रसाठा घेऊन फिरणाऱ्या तीन जणांविरुध्द नांदगाव पोलिसांनी कारवाई करुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नांदगाव तालुक्यातील कोंढार शिवारात संशयितरित्या एक वाहन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळाली असता चौधरी पथकासह रवाना झाले.
पोलिसांनी संशयित वाहनाचा पाठलाग करून कोंढार शिवारात ते अडवले. वाहनाची झडती घेतली असता बंदूक, २३ जिवंत पितळी राऊंड, दोन रिकाम्या पुंगळ्या, कोयते, चाकू, कुऱ्हाड, दुर्बीण, सर्च लाईट आदी साहित्य आढळून आले.
आणखी वाचा-नाशिकमधून थंडी अंतर्धान, शहर व ग्रामीण भागात धुक्याची दुलई
संशयितांना ताब्यात घेऊन तपास करण्यात आला. तपासात संशयितांच्या घरीदेखील हत्यारे असल्याचे समजले. निरीक्षक चौधरी यांनी मालेगाव येथे संशयितांच्या घरांची झडती घेतली असता, छऱ्याची बंदूक आणि इतर हत्यारे सापडले. शेख इरफान, अफजल अहमद, अन्सारी मोहंमद या तिघांविरुध्द नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.