नाशिक : टिटवाळ्याहून शिर्डी येथे दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनाने धडक दिल्याने तीन जणांचा मृ़त्यू झाला. मंगळवारी रात्री इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर रस्त्यावर हा अपघात झाला. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात संशयित वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण, टिटवाळा येथील भाविक मंगळवारी रात्री शिर्डी येथे घोटीमार्गे सिन्नरकडे जात असताना एका चारचाकी वाहनाची त्यांना धडक बसली. या धडकेमुळे भावेश पाटील (२२), कवी पाटील (२७) आणि साईराज भोईर यांचा मृ़त्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजीव पाटील आणि पथकाने परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची पाहणी करून विशाल सानप (२७, रा. सिन्नर) या संशयिताला बुधवारी ताब्यात घेतले. त्यास गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक पाटील यांनी दिली.