नाशिक : जिल्ह्य़ात २४ तासांत वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडाल्याने तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नांदगाव येथील दत्तू डगळे हा युवक रविवारी दुपारी एक वाजता जांभुळ बेट धरणावर गेला होता. परिसरात फिरताना पाय घसरून तोल गेल्याने तो धरणात पडला. नाका-तोंडात पाणी गेल्याने उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल के ले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित के ले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  दुसऱ्या घटनेत सातपूरच्या शिवाजी नगरातील रामनाथ उबाळे हे मित्रांसोबत इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. फिरताना धरणात उतरले असता बुडाले. स्थानिकांच्या मदतीने मित्रांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले. इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल के ले असता  डॉक्टरांनी मृत घोषित के ले.

दिंडोरी तालुक्यात तिसरी घटना घडली. दिंडोरी येथील विलास घुगे हे माळेदुमाला येथील शेतीवर पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. शेतातील विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले. पंप सुरू करत असताना त्यांचा तोल गेल्याने ते थेट विहिरीत पडले. जवळपास कोणी नसल्याने हा प्रकार उशिराने लक्षात आला. त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता विहिरीत मृतदेह आढळला. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.