नाशिक – शहरात तीन दिवसात हिट अँड रनच्या तीन घटना घडल्या असून त्यात दोन महिलांसह एका युवकाचा म़त्यू झाला आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द गुन्हे नोंदविण्यात आले असून एका चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सरफुद्दीन अन्सारी (२२, रा. संजीवनगर, अंबड) हा शहरातील पपया नर्सरीसमोरील रस्त्यावर उभा असतांना त्याला भरधाव वाहनाची धडक बसली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जवळच्या पेट्रोल पंपाचे तुषार मरसाळे यांनी अन्सारी यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना गंगापूर रस्त्याजवळील बारदान फाटा ते ध्रुवनगर रस्त्यावरील रानवारा हॉटेलजवळ घडली. एका वाहनाची धडक बसल्याने महिलेचा मृत्यू झाला. अर्चना शिंदे (३१, रा. हनुमान नगर, मोतीवाला कॉलेजजवळ, गंगापूर रोड, नाशिक) असे महिलेचे नाव आहे. अर्चना या पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या वाहनाची त्यांना धडक बसली. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला. गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे तसेच सहकाऱ्यांनी जखमी अर्चना यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गुन्हे शोध पथकाने वाहनाची माहिती घेत देवचंद तिदमे (५१, रा. ध्रुवनगर, नाशिक) यास ताब्यात घेतले. तिदमे याने मद्यप्राशन केलेले होते. त्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्याच्याविरुध्द गंगापूररोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

st bus accident pune solapur
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
what happens to the body if you brisk walk 2 kms every day
जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
mother and son died drowning Nashik district,
नाशिक जिल्ह्यात बंधाऱ्यात बुडून मायलेकासह तिघांचा मृत्यू
Pune Kalyani Nagar porsche accident case, trial
कल्याणीनगर अपघात प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता
college youth died, bullet hit the divider in pune,
पुणे : बुलेट दुभाजकावर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू, बुलेटच्या धडकेत पादचारी ज्येष्ठासह दोघे जखमी
‘McDonald’ बर्गर खाल्ल्याने ४९ जणांना ई-कोलायचा संसर्ग; कारण काय? हा जीवाणू किती घातक?
Citizens wait for a month for birth and death records in Thane due to technical problems in CRS portal
ठाण्यात जन्म-मृत्यु दाखल्यांसाठी महिनाभराची प्रतिक्षा; नव्या प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा नागरिकांना फटका

हेही वाचा >>>नाशिकमध्ये तीन दिवसात हिट अँड रनच्या तीन घटना, दोन महिलांसह युवकाचा मृत्यू

तिसरी घटना रविवारी घडली होती. नाशिकमधील कॉलेज रोड परिसरात डॉन बॉस्को शाळा ते क्रोमा चौक दरम्यान भरधाव वाहनाची धडक बसल्याने ४९ वर्षाच्या पादचारी महिलेचा मृत्यू झाला. निधी वारे (४९, गिरीराज अपार्टमेंट, कॉलेजरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. वारे या सायंकाळी भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून पायी घराकडे परतत असताना हा अपघात झाला. क्रोमा दालन ते डॉन बॉस्को शाळा दरम्यानच्या रस्त्याने त्या जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मालवाहू टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक आपल्या वाहनासह पसार झाला. चालकाविरूध्द गंगापूररोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताच्या तीन प्रकरणांपैकी गंगापूर रोडजवळील बारदान फाट्यावर झालेल्या अपघातातील संशयित ताब्यात आहे. कॉलेजरोड अपघातातील संशयित चालकाची ओळख पटली असून शोध सुरू आहे. अपघातांच्या या पार्श्वभूमीवर, दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात मोहीम सुरु करण्यात आली असून आतापर्यंत ४५ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.- चंद्रकांत खांडवी (पोलीस उपआयुक्त -वाहतूक, नाशिक)