नाशिक – शेतीच्या वादातून देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे हाणामारी होऊन तीन ते चार जण गंभीर जखमी झाले. यावेळी लाल तिखट फेकून लाठ्या-काठ्या, सळईने मारहाण करण्यात आली. जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी १४ जणांविरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नाशिक : विसर्गाची तयारी आज पूर्णत्वास; जायकवाडीचे पथक देखरेखीसाठी दाखल

महालपाटणे येथील गंगावाडी शिवारात ही घटना घडली. याबाबत शिवाजी चव्हाण यांनी तक्रार दिली. चव्हाण यांचा भाऊ बापू याने शेजारी राहणारे अशोक देवरे यांची ३५ गुंठे शेत जमीन खरेदी केली होती. या शेतावरून जवळच राहणारे रमेश देवरे, समाधान देवरे, भाऊसाहेब देवरे हे बापूला धमकावत होते. याबाबत चव्हाण यांच्या नातेवाईकांनी वेळोवेळी शेत जमिनीवरून वाद घालू नका, असे समजावले होते. परंतु, रमेश देवरे. समाधान देवरे प्रमिला देवरे, गुड्डाबाई आदी १० ते १५ जणांनी बापू चव्हाण, त्यांची पत्नी बायजाबाई , पुतण्या श्रीराम आणि चुलत पुतण्या संकेत यांना काठ्या, सळईने बेदम मारहाण केली. महिलांनी पिशवीतून लाल तिखट पावडर फेकत मारण्याचे आवाहन केले. यावेळी आसपासच्या काहींनी धाव घेऊन वाद सोडविला. मारहाणीत जखमी झालेल्यांना खासगी वाहनाने देवळा ग्रामीण रुग्णालयात नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रमेश देवरे, समाधान देवरे यांच्यासह देवरे कुटुंबातील प्रमिला, गुड्डाबाई, मिनाबाई, रोशन, दर्शन, उत्तम अहिरे, शरद अहिरे, समाधान अहिरे, निकिता अहिरे, प्रभाकर अहिरे, वाल्याबाई अहिरे यांच्याविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.