लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर मंगळवारी सकाळी कंटेनरने आयशर टेम्पो वाहनाला धडक दिल्याने मायलेकींचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. नादुरुस्त टेम्पो रस्त्यावर थांबलेला होता. अपघातामुळे उड्डाण पुलावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
Trainee pilot girl died, Trainee pilot girl organ donation ,
प्रशिक्षणार्थी वैमानिक तरुणीमुळे सहा जणांना जीवदान
56 people rescued due to JNPA vigilance
जेएनपीएच्या सतर्कतेने ५६ जण बचावले; बचावकार्यात पायलट बोटीची महत्त्वाची भूमिका

द्वारका ते आडगाव दरम्यान उड्डाण पुलावर पंचवटी महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. धडक इतकी जबरदस्त होती की, कंटेनरच्या चालक कक्षाचा चक्काचूर झाला. नादुरुस्त टेम्पोचे मागील भागाचे नुकसान झाले. उड्डाण पुलावर अकस्मात काही दोष उद्भवल्याने नादुरुस्त टेम्पो रस्त्यावर थांबलेला होता. भरधाव कंटेनर चालकाला त्याचा अंदाज आला नाही. कंटेनरने टेम्पोला मागून धडक दिली. या अपघातात नाफिसा अफजल शेख (३५) आणि त्यांची मुलगी तरन्नुम अफजल शेख (सात) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अफजल शेख आणि आयेशा शेख (सहा) यांच्यासह एक अनोळखी व्यक्ती असे तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अपघातामुळे उड्डाण पुलावरील एका बाजूची वाहतूक प्रभावित झाली.

आणखी वाचा-त्र्यंबकेश्वर प्रकरणात स्थानिकांचे सामंजस्य तर, राजकारणी कुरघोडीत व्यस्त

पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मायलेकींचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. उर्वरीत तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनरमधून शेख कुटुंबिय प्रवास करीत होता. ते गौळाणे येथील असल्याचे सांगितले जाते. मागील काही दिवसात उड्डाण पुलावरील अपघातात वाढ झाली आहे. या पुलावर दुचाकी वाहनांना बंदी आहे. तरीदेखील अनेक दुचाकीधारक मुक्तपणे भ्रमंती करीत असतात. अपघातात अनेक दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागले आहेत. सुमारे साडेसहा ते सात किलोमीटर अंतर असलेल्या उड्डाण पुलावर नादुरुस्त वाहने अडकून पडणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. नादुरुस्त आयशर टेम्पो या अपघाताचे कारण ठरल्याचे मानले जात आहे.

Story img Loader