नाशिक – नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला असून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पिंपरी फाट्यावर मोटार दुभाजकावर धडकून तीन जणांचा जागीच मृत्यू तर, तीन जण गंभीर जखमी झाले. शिर्डी येथे दर्शन घेऊन परतत असताना मंगळवारी हा अपघात झाला. अपघातातील मयत आणि जखमी नवी मुंबईजवळील खालापूर येथील रहिवासी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ का घातली ? शेतकऱ्याने कारण सांगितले….

नवी मुंबईजवळील खालापूर येथील गोयल आणि अग्रवाल कुटूंब शिर्डी येथे स्विफ्ट मोटारीतून दर्शनासाठी गेले होते. शिर्डीहून परतत असताना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावरील पिंपरी फाटा येथे अतीवेगातील मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. मोटार दुभाजकावर आदळून दुसऱ्या मार्गिकेत जाऊन उलटली. या अपघातात गीता रमेश अग्रवाल (७२), अनुज रमेश गोयल (५२,चालक), निर्मय अनुज गोयल (१६) यांचा जागीच मृत्यू झाला. रमेशचंद्र अग्रवाल (८०), मीती अनुज गोयल (४५) आणि दिव्यांशी अनुज गोयल (२१) हे गंभीर जखमी झाले. मयत आणि जखमींना रुग्णवाहिकेतून घोटीजवळील एसएमबीटी या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>> सारंगखेडा घोडे बाजारात १० दिवसात तीन कोटी रुपयांची उलाढाल

अपघातानंतर घटनास्थळावरून अपघातग्रस्त मोटार बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेची माहिती नातेवाईकांना कळविण्यात आली. इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय बुवा, गोपनीय विभागाचे पोलीस नीलेश देवराज, हवालदार विजय रुद्रे आदी करीत आहेत. समृध्दी महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. अतीवेगासह इतर अनेक कारणे त्यासाठी देण्यात येतात.