जळगाव : शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर जळगाव खुर्द गावालगतच्या पुलाजवळ रात्री झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नशिराबादच्या पुढे असलेल्या जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी काही परप्रांतीय मजूर काम करत आहेत. हे मजूर रात्री दुसरीकडे न जाता कामाच्या ठिकाणीच झोपतात. सोमवारी रात्री काम करणारे परप्रांतीय मजूर झोपलेले असताना, अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून तिन्ही मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. त्याठिकाणी मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.

Story img Loader